Take a fresh look at your lifestyle.

Pune Metro : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला गती, मेट्रोच्या स्टेशन व पार्किंगसाठी भूसंपादन सुरु, असा आहे मार्ग..

0

‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून ‘हिंजवडी ते शिवाजीनगर’ अशी मेट्रो तयार करण्याचे काम सुरू आहे. या मेट्रोच्या स्टेशन व पार्किंगसाठी जागा दिली जाणार आहे. गणेशखिंड रोडवरील अनेक इमारती, मॉल आणि चित्रपटगृहांची जागा ही पुणे महानगरपालिका ताब्यात घेऊन लवकरच ती ‘पीएमआरडीए’ला देणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली आहे.

तसेच, शहरात महामेट्रोकडून सुरू करण्यात आलेल्या मेट्रो सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना इच्छेप्रमाणे पार्किंगसाठी जागा देण्याची तयारी पालिकेने केली आहे. काल मंगळवारी मुंबईत वॉररूम याठिकाणी पुणे शहरातील मेट्रो, एसएमटीआर रस्ता, पीएमआरडीएची मेट्रो सेवा याबाबत बैठक झाली. या बैठकीला आयुक्त हजर होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीची माहिती आयुक्तांनी पत्रकारांना दिली आहे. (Pune Metro Line – 3 routes)

पुणे महानगरपालिकेकडून मेट्रोला १५० कोटी रुपये दिले जाणार आहेत. जी -२० च्या वेळी पुणे महानगरपालिकेकडून मेट्रोच्या हद्दीत करण्यात आलेल्या विकासकामांचा खर्च वजा करून ही रक्कम दिली जाणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. तर, ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या मैट्रोबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशखिंड रोडवर रॅम्प उभारण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठीचे रस्तारुंदीकरण करण्याचे कामही पालिकेला करावे लागणार आहे.

पुणे मेट्रो लाइन – 3 मार्ग.. 

लाइन- 3 : हिंजवडी – दिवाणी न्यायालय

लांबी : 23.33 किमी
प्रकार: उन्नत
डेपो: मान गाव (20 हेक्टर)
स्थानकांची संख्या : 23
स्टेशनची नावे: मेगापोलिस सर्कल, एम्बेसी क्वाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज II, विप्रो फेज II, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, NICMAR, राम नगर, लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव , सकाळ नगर, विद्यापीठ, R.B.I., कृषी महाविद्यालय, शिवाजी नगर आणि दिवाणी न्यायालय.

Leave A Reply

Your email address will not be published.