भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन हावडा मैदान मेट्रो स्टेशन हे आहे. हे कोलकात्याच्या मेट्रो लाईनवर आहे जिथे पहिली अंडरवॉटर मेट्रो चालवली गेली आहे. परंतु आता हा रेकॉर्ड मोडला असून भारतातलं सर्वात खोल मेट्रो स्टेशन बांधून तयार झालं आहे. पुण्यात बांधण्यात येणारे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन हे भारतातील सर्वात खोल स्टेशन साकारलंय..
हे जमिनीपासून 33.1 मीटर (108.59 फूट) खाली बांधले जात आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प हा भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम असून 1000 दुचाकी आणि 100 कारसाठी पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सामान्य इमारतीच्या 2 मजल्यांमधील फरक सुमारे 3 – 4 मीटर असतो म्हणजेच हे स्टेशन इतके खोल आहे की त्यात 10 मजली इमारत बसवता येऊ शकते.
पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट (17Km) आणि वनाझ ते रामवाडी (16 Km) अशा दोन रूट आहेत. दोन्ही रूट सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनमध्ये एकमेकींना छेदतात. त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन महत्त्वाचे स्टेशन म्हणून उभारण्यात येत आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनमध्ये पीसीएमसी (PCMC) ते स्वारगेट रुट वरील अंडरग्राउंड स्थानक आणि वनाझ ते रामवाडी या रुटवरील एलिव्हेटेड स्टेशन आहे.
अंडरग्राउंड व एलिव्हेटेड स्टेशन यांना एस्केलेटर आणि लिफ्टने जोडले आहे. या स्टेशनचे काम पूर्ण होत आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनची खोली 33.1 मीटर (108.59 फूट) असून, हे भारतातील सर्वांत खोल मेट्रो स्टेशन आहे. या अंडरग्राउंड स्टेशनचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या अंडरग्राउंड स्टेशनचे छत 95 फूट उंच असून, तेथे थेट सूर्यप्रकाश वा नैसर्गिक प्रकाश पडेल, अशी व्यवस्था केली आहे.
असे वैशिष्ट्य असणारे हे एकमेव अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन आहे. या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाला डेंगळे पूल, कामगार पुतळा आणि पुणे जिल्हा न्यायालय या बाजूंनी प्रवाशांना येण्या – जाण्यासाठी पादचारी वा वाहतुकीची सुविधा केली आहे. सिव्हिल कोर्ट ते हिंजेवाडी ही पुण्यात बांधण्यात येणारी तिसरी मेट्रो मार्गिका पादचारी पुलाने या स्थानकाला जोडण्यात येणार आहे.
त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक हे मध्यवर्ती स्थानक म्हणून नावारूपाला येईल. त्यामुळे या स्थानकात 8 लिफ्ट आणि 18 एस्केलेटर बसविण्यात येत आहेत. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाचा एकूण परिसर 11.17 एकर असून, या स्टेशनला येण्या – जाण्यासाठी एकूण 7 दरवाजे आहेत. या स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्किंगची व्यवस्था केली आहे.
पुणे मेट्रो रूट मॅप आणि स्टेशन्स पहा..
पुणे मेट्रो पर्पल लाईन :
उत्तरेकडील PCMC ते दक्षिणेकडील स्वारगेटला जोडणारी पुणे मेट्रोची पर्पल लाईन 17.4 किमी पसरलेली असून 14 स्टेशन्स आहेत – PCMC, संत तुकाराम, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, रेंज हिल, शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट.
पुणे मेट्रो ॲक्वा लाइन :-
पुणे मेट्रोची ॲक्वा लाइन पश्चिमेकडील वनाझ ते पूर्वेकडील रामवाडीला जोडते. वनाझ, आनंद नगर, आयडियल नगर, नल स्टॉप, गरवारे कॉलेज, डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी उद्यान, पीएमसी, सिव्हिल कोर्ट, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्टेशन, रुबी हॉल क्लिनिक बंड गार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी अशा 16 स्टेशनसह 15.7 किमी लांबीची ही लाईन पूर्णपणे स्ट्रेट आहे.
पुणे मेट्रो मेट्रोपॉलिटन लाईन –
23.3 किमी लांबीचा भाग व्यापणारा, तिसरा कॉरिडॉर, मेट्रोपॉलिटन लाईन, सध्या बांधकामाधीन आहे आणि त्यात 23 स्टेशन असतील – मेगापोलिस सर्कल, डोहलर, इन्फोसिस फेज II, विप्रो टेक्नॉलॉजीज, पाल इंडिया, शिवाजी चौक (एचएच) ), हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, NICMAR, रामनगर, लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, भारतीय कृषी संशोधन संस्था, सकाळ नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतीय रिझर्व्ह बँक, कृषी महाविद्यालय, शिवाजी नगर आणि सिव्हिल कोर्ट.