Pune – Miraj Railways : दुहेरीकरणाच्या कामाने पकडला वेग, नांद्रे ते सांगली दुहेरीकरण पूर्ण, आता फक्त 4 तासांत प्रवास होणार शक्य..
मिरज – पुणे रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्यात आहे. रेल्वे पुलाचे काम, रेल्वे मार्गावरील डोंगराळ भाग, घाट, बोगदे, नदीवरील पुलांमुळे कामास विलंब होत आहे. सांगलीतील काम वेगाने आहे. मार्च 2024 अखेरपर्यंत मिरज – पुणे रेल्वेमार्ग दुहेरीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांच्या विकासाचे नवे दार आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या पुणे – मिरज रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे काम गतीने सुरु आहे. मिरज ते पुणे मार्गावर नांद्रे (ता. मिरज) रेल्वे स्टेशनपर्यंत दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे नांद्रे ते सांगली दुहेरीकरण 5 ते 6 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मिरज – पुणे 280 किलोमीटर रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामास सहा वर्षांपूर्वी सुरुवात झाली. रेल्वेने सांगलीहून पुण्याला जाण्यासाठी सुमारे सहा तास लागतात. मिरज – पुणे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर सहा तासांच्या प्रवासाचा वेळ चार तासांवर येईल. दोन तासाने प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरु..
मिरज – पुणे रेल्वेमार्गावर दुहेरीकरणाचे काम गतीने सुरु आहे . सातारा जिल्ह्यात डोंगराळ भाग , घाटमार्ग , बोगदे , पुलामुळे कामास विलंब होत आहे . दुहेरीकरणाच्या मार्गावर सांगलीतील काम गतीने सुरु असून काही दिवसातच हे काम पूर्ण होईल . मार्च २०२४ अखेर पुणे ते मिरज या मार्गावरील दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल अशी माहिती सांगली रेल्वे स्टेशनचे स्टेशन प्रबंधक विवेककुमार पोद्दार यांनी दिली.
आठवड्याभरात सांगलीतील काम
पूर्ण मिरज – पुणे रेल्वेमार्गावरील सांगली शहरातील चिंतामणी नगरच्या रेल्वे पुलाचे काम गतीने सुरु असून ते येत्या आठवड्याभरात पूर्ण होईल. पुलाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे. यापूर्वी सह्यादीनगरच्या रेल्वे पुलाचे काम पूर्ण झाले आहे.
दुहेरीकरण मार्गावरील अपूर्ण कामे..
शिंदवणे – आम्ले 12 किमी बोगद्यामुळे विलंब
आदर्की – वाठार 1 स्टेशन , बोगद्यामुळे विलंब
जरंडेश्वर – सातारा 1 स्टेशन कामास विलंब
कोरेगाव – शेणोली काम सुरु आहे .
नांद्रे – सांगली आठवड्यात पूर्णत्वाची शक्यता..
दुहेरीकरण मार्गावरील पूर्ण कामे
पुणे – शिंदवणे : 7 स्टेशन
नीरा – लोणंद : 1 स्टेशन
आम्ले – नीरा : 4 स्टेशन
लोणंद – आदकी : 3 स्टेशन
वठार – जरंडेश्वर : 3 स्टेशन
सातारा – कोरेगाव : काम पूर्ण