Pune Ring Road । 172Km अंतर, 695 हेक्टरचे होणार भूसंपादन, 22,000 कोटींचा खर्च, ‘या’ दिवशी होणार बांधकामाला सुरुवात, शंभुराज देसाई यांची माहिती..
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) जिल्ह्यातील प्रस्तावित वर्तुळाकार (Ring Road) रस्त्यासाठी भूसंपादनाचे केले आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून, या प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी राज्य सरकारच्या वतीने बुधवारी विधानसभेत दिली.
पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रिंगरोड हाती घेतला आहे. पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले असून, पूर्व भागात मावळातील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावांचा समावेश आहे.
तर पश्चिम भागात भोरमधील 5, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळातील 6 गावांचा समावेश आहे.
रिंगरोडसाठी 695 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. प्रकल्पाची निविदा सुमारे 22 हजार कोटी रुपयांची असणार असून, गृहनिर्माण व शहरी विकास महामंडळाकडून (हुडको) 10 हजार 200 कोटी रुपये रस्ते महामंडळाला हुडकोकडून वाढीव तरतुदीनुसार अधिक रकमेबाबत मागणी रस्ते महामंडळाकडून करण्यात येणार आहे.
त्यामुळे भूसंपादनापोटी द्यावयाच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. परिणामी, प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. विधिमंडळात दौंडचे आमदार राहुल कुल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राज्य सरकारच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली.
695 हेक्टर जमीन भूसंपादनासाठी 3,500 कोटींचा निधी, महिनाभरात अशी पार पडणार भूसंपादन प्रक्रिया, पहा रोडमॅप..
शंभूराज देसाई म्हणाले की, ‘संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला आवश्यक असणारा हा प्रकल्प असून हा प्रस्तावित रिंग रोड पूर्व व पश्चिम या दोन विभागांत आहे. प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. पश्चिम भागातील रस्त्याची प्रक्रिया फेब्रुवारी 2023 मध्ये पूर्ण करण्यात येणार असून प्रकल्पबाधितांना मोबदला दुप्पट केला आहे. या रस्त्याचे काम 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार असून, हे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.