रेल्वे भरतीकडे सर्वच भारतीयांचे लक्ष लागलेले असते. अशातच रेल्वेने 1300 जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती सेंट्रल रेल्वेसाठी असणार आहे. लोको पायलट, गार्ड आणि इतर काही पदांसाठी ही भरती आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता, शिक्षण, वयोमर्यादा आणि इतर तपशील जाणून घेऊ या.

भारतीय रेल्वेमध्ये काम करणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे रेल्वे भरतीसाठी अनेकजण वर्षभर तयारी करत असतात. रेल्वेमध्ये दर काही वर्षांनी महाभरती होत असते . नुकतीच रेल्वे प्रशासनाने एक घोषणा केली आहे . ज्यामध्ये सेंट्रल रेल्वेसाठी महाभरतीची जाहिरात देण्यात आली आहे.

ज्युनिअर इंजिनिअर, लोको पायलट, टेक्निशियन आणि ट्रेन मॅनेजर या पदांसाठी ही महाभरती असणार आहे.

एकूण 1303 पदांसाठी असलेली ही भरती केवळ सेंट्रल रेल्वेसाठी असणार आहे. विशेष म्हणजे ही भरती केवळ जीडीसीई (जनरल डिपार्टमेंटल कॉम्पेटेटीव्ह एक्झामिनेशन) कोट्यातील उमेदवारांसाठी आहे. म्हणजे जे उमेदवार पहिल्यापासून रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहे, अशा रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ही ज्युनिअर इंजिनिअर, लोको पायलट, टेक्निशियन आणि ट्रेन मॅनेजर या पदांसाठी ही महाभरती असणार आहे.

एकूण 1303 पदांसाठी असलेली ही भरती केवळ सेंट्रल रेल्वेसाठी असणार आहे. विशेष म्हणजे ही भरती केवळ जीडीसीई (जनरल डिपार्टमेंटल कॉम्पेटेटीव्ह एक्झामिनेशन) कोट्यातील उमेदवारांसाठी आहे. म्हणजे जे उमेदवार पहिल्यापासून रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहे, अशा रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ही अंतर्गत भरती आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले असून, सेंट्रल रेल्वेच्या rrccr.com या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, तर 2 सप्टेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

कोणाला करता येणार अर्ज ?

ही भरती जीडीसीई कोट्यातील असल्याने या पदांसाठी अर्ज करणारी व्यक्ती मध्य रेल्वेची नियमित कर्मचारी असण आवश्यक आहे. तसेच 1 ऑगस्ट 2021 पूर्वी या कर्मचाऱ्याची नियुक्ती झालेली असणे गरजेची आहे.

ज्या कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे किंवा ज्यांची बदली मध्य रेल्वेमधून दुसरीकडे झाली आहे; त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.

एकूण जागा आणि पदे.. 

असिस्टंट लोको पायलट – 732
टेक्निशियन – 255
ज्युनिअर इंजिनिअर – 234
गार्ड / ट्रेन मॅनेजर – 82

शैक्षणिक पात्रता :-

असिस्टंट लोको पायलट 

एनसीव्हीटी / एससीव्हीटीच्या मान्यताप्राप्त संस्थांमधून मंद्रिक्युलेश / एसएसएलसी आणि आयटा आय किंवा त्याएवजी एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनिअरिंगचा तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक..

टेक्निशियन –

एनसीव्हीटी / – एससीव्हीटीच्या मान्यताप्राप्त संस्थांमधून मॅट्रिक्युलेश / एसएसएलसी आणि आयआयटी सर्टिफिकेट आवश्यक.

ज्युनिअर इंजिनिअर –

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बेसिक स्ट्रीमच्या कोणत्याही सब स्ट्रीममध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक.

वयोमर्यादा –

यूआर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 42 वर्षे वयोमर्यादा आहे, तर ओबीसी प्रवर्गासाठी 45 वर्ष आणि एससी / एसटी प्रवर्गासाठी 47 वर्षे वयोमर्यादा आहे.

PDF डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्जासाठी :- इथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *