पुणे शहरात 1 ऑगस्टपासून सुरू केलेल्या मेट्रो सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. रविवारी (दि.13) सुट्टी आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आलेल्या सुट्टीचे औचित्य साधून पुणेकरांनी मेट्रोसफरीचा आनंद लुटला. दरम्यान, प्रवाशांना सूचना देण्यासाठी मेट्रोकडून खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. (Pune Metro Timetable)

दोन दिवसांत मेट्रोने 1 लाख 69 हजार प्रवाशांनी प्रवास केला. आणि मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट’ रुबी हॉल ते ‘गरवारे महाविद्यालय’ या मेट्रो मार्गांचे लोकार्पण झाले.

या नवीन मार्गांच्या लोकार्पणामुळे ‘पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट’ आणि ‘वनाज ते रुबी हॉल’ या मार्गांवर प्रवास करणे शक्य होत आहे. मेट्रोचे कमीत कमी भाडे 10 रुपये असून, जास्तीत जास्त भाडे 35 रुपये आहे. ‘पीसीएमसी ते वनाज’ असा प्रवास करण्यासाठी 40 मिनिटे लागत आहेत आणि त्यासाठी 35 रुपये भाडे लागेल.

तसेच, ‘पीसीएमसी ते रुबी हॉल’ यासाठी 30 रुपये भाडे आहे. ‘वनाज ते रुबी हॉल’ यासाठी 35 रुपये भाडे आहे. विद्यार्थ्यासाठी भाड्यामध्ये 30 टक्के सवलत असणार आहे शनिवार रविवार सर्व नागरिकांसाठी 30 टक्क सवलत असणार आहे. तसेच, मेट्रो कार्डधारकांसाठी सरसकट 10 टक्के सवलत असणार आहे.

मेट्रो कार्ड लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. रोख, क्रेडिट डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, मेट्रो अँपद्वारे तिकीट खरेदी करता येईल.

तिकीट खिडकी, तिकीट व्हेंडिंग मशीन, व्हॉट्सअँप इत्यादी पद्धतीने तिकीट प्राप्त केले जाऊ शकते. पीएमपीद्वारे फीडर बससेवा उपलब्ध करून दिली आहे तीन कोचची ट्रेन असून, त्यातील एक डबा महिलांसाठी राखीव आहे. दिव्यांगांसाठी मेट्रो कोचमध्ये विशेष जागा राखीव ठेवली आहे. मेट्रो स्थानक व मेट्रो कोचमध्ये इमर्जन्सी हेल्प बटणही ठेवले आहे.

पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल..

पुणे मेट्रो आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहणार आहे. पुणे मेट्रो आपली प्रवासी सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी 1 तास लवकर सुरू करीत आहे. संबंधित बदल हा वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर लागू करण्यात आला आहे पिंपरी – चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानकाच्या वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या मार्गावरील सेवा सकाळी 7 ते रात्री 10 अशीच सुरू असणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.

पुणे मेट्रोचे टाइम टेबल पुढीलप्रमाणे..

वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग..

सकाळी 6 ते 8 – दर 15 मिनिटांनी
सकाळी 8 ते 11 दर 10 मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 दर 10 मिनिटांनी
रात्री 8 ते 10- दर 15 मिनिटांनी

पिंपरी – चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्ग..

सकाळी 7 ते 8 – दर 15 मिनिटांनी
सकाळी 8 ते 11 – दर 10 मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 – दर १५ मिनिटानी
दुपारी 4 ते रात्री 8 – दर 10 मिनिटांनी
रात्री 8 ते 10 – दर 15 मिनिटांनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *