केंद्रीय बँक आरबीआयने (RBI) अनियमिततेसाठी गुजरात आणि पुणे (महाराष्ट्र) या दोन सहकारी बँकांवर कठोर कारवाई केली आहे. या बँकांवर आरबीआयने दंड ठोठावला आहे. सोमवारी आरबीआयने (RBI) गुजरातमधील राजकोट सहकारी बँक (Co-operative Bank of Rajkot) आणि पुण्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेवर (Rajgurunagar Sahakari Bank) केलेल्या कारवाईची माहिती दिली.

राजगुरुनगर सहकारी बँकेला चार लाखांचा दंड ठोठावला आहे. व्याजदर आणि ठेवींबाबत केंद्रीय बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचवेळी जनजागृती योजनांशी संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल राजकोटच्या सहकारी बँकेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Panjabrao Dakh: आज पुन्हा “या जिल्ह्यांना” जोरदार पाऊस झोडपणार; पहा 30 ऑक्टोबर पर्यंतचा नवीन हवामान अंदाज

Raj Rajgurunagar Sahakari Bank बँकेवर या कारणामुळे ॲक्शन :-

राजगुरुनगर सहकारी बँकेच्या निरीक्षण रिपोर्टमध्ये मयत वैयक्तिक ठेवीदारांच्या किंवा एकल मालकीच्या चालू खात्यात जमा केलेल्या पैशांवर वारसांना व्याज देण्यात अपयशी ठरल्याचे उघड झाले होते. यावर आरबीआयने (RBI) बँकेला नोटीस पाठवली होती, परंतु बँकेने कारणे दाखवा नोटीसवर पाठवलेल्या लेखी उत्तरावर केंद्रीय बँकेला समाधानकारक उत्तर भेटलं नसल्याने RBI ला आढळले की, बँकेने नियमांनुसार काम केलं नाही, त्यामुळे बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 56 आणि कलम 46 (4) (i) आणि कलम 47A (1) (c) च्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे.

या निर्णयाचा बँकेच्या ग्राहकांवर किंवा कोणत्याही व्यवहारावरही परिणाम होणार नसल्याचं म्हटलं असून पुन्हा जर अशा चुका केल्यास कठोर कारवाईचे देश दिले आहे.

Co-operative Bank of Rajkot या कारणामुळे ॲक्शन :-

राजकोट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक तपासात आरबीआयने (RBI) अनियमितता पकडली. बँकेने दहा वर्षांहून अधिक काळ ज्या खात्याचा कोणी दावेदार नाही त्या खात्यांचे पैसे डिपॉजिटर एजुकेशन ॲड अवेयरनेस फंड पाठवले नसल्याने हे केंद्रीय बँकेच्या तरतुदींचे उल्लंघन आहे.

यासाठी आरबीआयने राजकोटच्या सहकारी बँकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. बँकेच्या लेखी आणि तोंडी उत्तराच्या आधारे आरबीआयने हा दंड ठोठावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *