तलाठी पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील हजारो युवकांसाठी एक दिलासादायक आणि महत्व पूर्ण अपडेट आलं आहे. आज 7 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित करुन राज्यांमध्ये तलाठी आणि महसूल मंडळ अधिकाऱ्यांच्या 3 हजार 628 पदांच्या भरतीसाठी पदनिर्मिती करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.
या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती पदे निर्मीती केली जाणार आहे? या यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
या पदभरती संदर्भात 2014 मध्ये एक समिती गठीत करण्यात आली होती या समितीच्या माध्यमातून 2018 मध्ये जो अहवाल सादर करण्यात आलेला होता या अहवालाच्या अधीन राहून राज्यांमध्ये 3110 तलाठी व 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पद निर्मितीला मंजुरी देण्यात आलेली आहे.
यामध्ये पुणे महसूल विभागात 602 तलाठी तर 100 महसूल मंडळ अधिकाऱ्यांसाठी, तर नाशिक महसूल विभागात 689 तलाठी तर 115 महसूल मंडळ अधिकाऱ्यांची पदभरती केली जाणार आहे.
राज्यातील 6 महसूल विभागातील सर्व 36 जिल्ह्यांतील जिल्हानिहाय तलाठी आणि मंडळ अधिकारी पद संख्या पाहण्यासाठी खाली दिलेला चार्ट पहा..
पुणे महसूल विभाग
अमरावती महसूल विभाग
औरंगाबाद महसूल विभाग
नाशिक महसूल विभाग
कोकण महसूल विभाग
नागपूर महसूल विभाग
तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना किती मिळणार पगार…
या तलाठी वेतन श्रेणीमध्ये 25,500 ते 81,100 अशी वेतनश्रेणी देण्यात आली आहे. या वेतन श्रेणीच्या अधीन राहून 3110 तलाठी तर मंडळ अधिकारी वेतन श्रेणीमध्ये 32,000 ते 1,01,600 अशा प्रकारची वेतनश्रेणी यां अंतर्गत 518 मंडळ अधिकारी अशा प्रकारची पद निर्मिती करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या पदभरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील हजारो युवकांना दिलासा मिळणार आहे.