7 लाख शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट, 50,000 रु. अनुदान खात्यावर जमा, दुसरी यादी ‘या’ दिवशी होणार प्रसिद्ध, पहा तालुकानिहाय पात्र लाभार्थी
राज्य सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी आणखी गोड करत त्यांच्या खात्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ गुरुवारी केला. शुभारंभाप्रसंगी एकाच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 2 हजार 500 कोटी रुपये जमा करण्यात आले.
या योजनेअंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे 37 हजार 164 शेतकऱ्यांना 185 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान बँक खात्यावर जमा झाल्याने त्यांची दिवाळी गोड झाली आहे. तर जिल्ह्यातील अद्यापही 1 लाख 66 हजार 605 नियमित कर्जदार शेतकऱ्यांची दुसरी यादी दिवाळी पाडव्यानंतर 26 किंवा 27 तारखेला प्रसिद्ध होणार असल्याचं कृषी विभाकडून समजलं आहे.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली होती. पहिल्यांदा 2 लाखापर्यंत थकित कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली होती. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची वाढती नाराजी लक्षात घेता नियमित कर्जदारांनाही अनुदान देण्याचे जाहीर केले होते दुसऱ्या टप्यामध्ये शासनाने नियमित कर्जदारांना 50 हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान योजनेची अंमलबजावणी सुरु केली.
मार्च महिन्यात सादर केलेल्या अंदाजपत्रकात नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी तरतूद केली होती. राज्यात सत्तांतर होवून शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर नियमित कर्जदार शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे जाहीर अनुदान करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांनी बँका, विकास संस्थांकडून 2017-18, 2018-19 व सन 2019-20 या कालावधीत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची नियमित परतफेड केली आहे . त्या शेतकऱ्यांनी 2019 -20 मध्ये परतफेड केलेल्या रक्कमेनुसार 50 हजारपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या 2 लाख 3 हजार 769 इतक्या खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे .
त्यापैकी पहिल्या यादीमध्ये 37 हजार 164 इतक्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली होती.राज्य शासनाने नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहन अनुदान जमा करण्याची कार्यवाही गुरुवारी सुरु केली .
तालुकानिहाय पात्र शेतकरी अन् पहिल्या यादीत नावे आलेली संख्या :-
नगर – 28410 शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी 5196
संगमनेर – 12530 शेतकरी पात्र, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी 4190
कोपरगाव – 7,457 शेतकरी पात्र, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी 1325
पाथर्डी – 26128 शेतकरी पात्र, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी 3852
नेवासे – 7021 शेतकरी पात्र, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी 606
राहाता – 6212 शेतकरी पात्र, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी 1191
राहुरी – 3758 शेतकरी पात्र , पहिल्या लाभार्थी शेतकरी 478
शेवगाव – 7120 शेतकरी पात्र , पहिल्या टप्प्यातील लाभार्थी 761
जामखेड – 9470 शेतकरी पात्र, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी 2888
कर्जत – 14348 शेतकरी पात्र, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी 3548
श्रीगोंदे – 8569 शेतकरी पात्र. पहिल्या टप्प्यातील लाभार्थी 824