Take a fresh look at your lifestyle.

Diwali ला चं करा नव्या घराचं भूमिपूजन, दोन महिन्यात स्टीलचे दर आले निम्म्यावर, पहा नवे दर. . .

0

देशात सणासुदीचा हंगाम सुरू असून दिवाळीला फक्त दोन दिवस उरले आहेत. या काळात, बहुतेक गोष्टींवर डिस्काउंट सुरू आहे. दरम्यान, अशाच एका वस्तूच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे, जी तुमच्या स्वप्नातील घर बनवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आपण स्टील बारबद्दल जाणून घेणार आहोत, दिवाळीपूर्वीच स्टीलच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. म्हणजेच आता तुमच्यासाठी घर तयार करण्याचा खर्च कमी होणार आहे.

स्टीलच्या किमतीत 40% घट

पीटीआयवर स्टीलमिंटच्या हवाल्या कडून सांगण्यात आलं आहे की,स्टीलच्या किमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या सहा महिन्यांबद्दल बोलायचे झालं तर त्याची किंमत 40 टक्क्यांनी कमी होऊन ती 57,000 रुपये प्रति टनावर आली आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, त्याच्या किमतींवर सर्वात मोठा परिणाम रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रात दिसून येतो. ते महाग झाले की, बांधकामाचा खर्च वाढतो आणि स्वस्त झाला की तुमच्या खिशाचा भार कमी होतो.

एप्रिल महिन्यात भाव होते उच्च पातळीवर. . .

रिपोर्टनुसार, एप्रिल 2022 च्या सुरुवातीला देशांतर्गत बाजारात स्टीलच्या किमती 78,800 रुपये प्रति टन या पातळीवर पोहोचल्या होत्या. त्यावर 18% GST जोडल्यास ते सुमारे 93,000 रुपये प्रति टन होते.

सध्या त्याची किंमत 57,000 रुपये प्रति टनावर आली आहे. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, एप्रिलच्या अखेरीस स्टीलच्या किमती घसरण्यास सुरुवात झाली. अवघ्या दोन महिन्यांत स्टील बारच्या किंमती जूनअखेर 60,200 रुपये प्रति टनावर आल्या होत्या.

प्रमुख शहरांमध्ये TMT स्टील बारची किंमत (18% GST विना)

शहर (राज्य) 04 जुलै 19 अक्टूबर
रायगढ़ (छत्तीसगढ़) 52,400 रुपये/टन 50,000 रुपये/टन
राउरकेला (ओडिशा) 53,400 रुपये/टन 51,100 रुपये/टन
नागपुर (महाराष्ट्र) 54,200 रुपये/टन 51,900 रुपये/टन
हैदराबाद (तेलंगाना) 56,500 रुपये/टन 52,000 रुपये/टन
जयपुर (राजस्थान) 55,700 रुपये/टन 53,100 रुपये/टन
भावनगर (गुजरात) 56,700 रुपये/टन 54,500 रुपये/टन
गाजियाबाद (यूपी) 56,700 रुपये/टन 52,200 रुपये/टन
इंदौर (मध्य प्रदेश) 55,300 रुपये/टन 54,200 रुपये/टन
गोवा 57,000 रुपये/टन 53,500 रुपये/टन
चेन्नई (तमिलनाडु) 58,000 रुपये/टन 54,500 रुपये/टन
दिल्ली 56,900 रुपये/टन 53,300 रुपये/टन
मुंबई (महाराष्ट्र) 55,200 रुपये/टन 55,100 रुपये/टन
कानपुर (उत्तर प्रदेश) 59,000 रुपये/टन 55,200 रुपये/टन
जालना (महाराष्ट्र) 55,100 रुपये/टन 54,000 रुपये/टन
Leave A Reply

Your email address will not be published.