शेतीशिवार टीम : 1 ऑक्टोबर 2022 :- भारतात वीजनिर्मिती ही फार मोठी समस्या तर नाही, परंतु, सध्या दरमहा येणारं मोठं बिल ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.मात्र, इतर देशांच्या तुलनेत भारतातील विजेचा दर खूपच स्वस्त आहे. मात्र सध्याची वाढत्या महागाईत दरमहा येणाऱ्या लाईट बिलांनी सर्वसामान्यांचं जिणं मुश्किल केलं आहे.
त्यामुळेच विजेच्या टंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडून सौरऊर्जेला चालना देण्यात येत आहे. यासाठी सौर पॅनेल योजनेंतर्गत देशातील जनतेला त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल (Solar Rooftop Yojana) बसविण्यासाठी भारत सरकारकडून अनुदान दिलं जात आहे.
देशातील विजेचा वापर कमी करून सौरऊर्जेवरील अवलंबित्व वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून लोकांना परवडणाऱ्या दरात वीज मिळू शकेल. सोलर पॅनल बसवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला एकदाच पैसे खर्च करावे लागतील. त्यानंतर तुम्ही 25 वर्षे मोफत वीज घेऊ शकता.
आज ‘Sheti Shivar’ च्या माध्यमातून आपण सरकारच्या सोलर पॅनल सबसिडी (Solar Rooftop Subsidy in Maharashtra) योजनेअंतर्गत तुम्हाला किती सबसिडी मिळेल, सबसिडीसाठी कुठे अर्ज करावा ? अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ? ही सर्व आवश्यक माहिती जाणून घेणार आहोत..
तुम्ही 25 वर्षे मोफत मिळवू शकता वीज :-
तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून तुम्ही सुमारे 25 वर्षांच्या वीज बिलातून सुटका मिळवू शकता. या योजनेंतर्गत, तुम्हाला सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकारकडून सबसिडी दिली जाईल आणि उर्वरित पैसे तुम्ही सौर पॅनेल बसवण्यासाठी खर्च कराल ते 5 वर्षांच्या आत कव्हर केले जातील. यानंतर, तुम्हाला पुढील 20 वर्षे मोफत विजेचा लाभ मिळू शकेल. सोलार पॅनल बसवल्यानंतर तुम्ही अगदी कमी खर्चात 24 तास विजेचा आनंद घेऊ शकता…
वीज विकूनही तुम्ही पैसे कमवू शकता :-
तुमच्या घराच्या छतावर बसवलेल्या सोलर पॅनल्समधून तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण करत असाल, तर ती अतिरिक्त वीज तुम्ही ग्रीडला विकून पैसे कमवू शकता. नेट मीटर आणि जनरेशन मीटर देखील सोलार पॅनल सिस्टीम सोबत बसवले आहेत, सोलर पॅनल मधून निर्माण होणाऱ्या विजेपासून ग्राहक नफा कमवू शकतील आणि कंपनीला विकली जाणारी अतिरिक्त वीज आणि नेट मीटरद्वारे विकली जाणारी वीज देखील मोजली जाईल..
सोलर पॅनल बसवण्यासाठी किती मिळेल अनुदान :-
1 ते 3 किलोवॅट रूफटॉप सोलर प्लांटवर 40% अनुदान दिलं जाईल…
3 किलोवॅट ते 10 किलोवॅट सोलर प्लांटवर 20% अनुदान दिलं जाईल.
कॅल्क्युलेशन पहा
1 किलोवॅटकरिता :- 46.820 रुपये खर्च :- 40% अनुदान म्हणजे 18,720 रु. प्राप्त होईल. प्रक्रिया शुल्काव्यतिरिक्त अंदाजे 28,092 रुपये खर्च येऊ शकतो.
2 किलोवॅटकरिता :- 84940 रुपये खर्च :- 40% अनुदान 33,976 इतके अनुदान प्राप्त होईल, अनुदान वगळता ग्राहकाला प्रक्रिया शुल्काव्यतिरिक्त अंदाजे 33976 रुपये खर्च येऊ शकतो.
3 किलोवॅटकरिता 1,24,140 रुपये खर्च :- 40% म्हणजेच 49,656 इतके अनुदान प्राप्त होईल, अनुदान वगळता ग्राहकाला प्रक्रिया शुल्काव्यतिरिक्त अंदाजे 74,440 रुपये खर्च येऊ शकतो.
सोलर पॅनल सबसिडी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
डिस्कॉम अधिकारी, लाभार्थी आणि विक्रेता यांचा सोलर सिस्टीम कमिशनिंग रिपोर्ट
सोलर पॅनेल सिस्टम सेटअपसाठी विक्रेत्याकडून पेमेंट प्रमाणपत्र (बिल).
10 kW पेक्षा कमी सेटअपसाठी इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक किंवा कंत्राटदाराकडून प्रमाणपत्र
जॉईन इन्स्टोलेशन रिपोर्ट
सोलर पॅनल सबसिडी योजनेसाठी अर्ज कसा कराल ?
सोलर रूफटॉप योजनेसाठी उमेदवार त्यांच्या छतावर सोलर पॅनेल मोफत बसवण्यासाठी अधिकृत वेबसाइट solarrooftop.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या प्रक्रियेद्वारे जाणून घ्या –
solarrooftop.gov.in वर या अधिकृत व्हेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ‘Solar Rooftop Calculator’ हे कॅल्क्युलेटर देण्यात आलं आहे. यामध्ये तुम्हाला ‘Solar Panel Capacity you want to install’ यावर क्लिक करून तुमच्या किती किलोवॅट सोलर पॅनल लागणार आहे तसेच ‘Your budget’ इत्यादी माहिती भरून तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता…
या नंतर तुम्ही होम पेजवर Apply For Rooftop Solar पर्यायावर क्लिक करा.
पुढील पृष्ठावर आपल्या राज्याच्या वेबसाइटच्या css.mahadiscom.in लिंकवर क्लिक करा.
अर्ज तुमच्या समोर उघडेल.
फॉर्ममध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
सौर रूफटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
टीप : तुम्ही हा फॉर्म जनसेवा केंद्रावरही भरू शकता.
सोलर रूफटॉप योजनेचा (Solar Rooftop Yojana) हेल्पलाइन क्रमांक :-
सोलर रूफटॉप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी किंवा या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही या हेल्पलाइन क्रमांक 1800 180 3333 वर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपर्क माहिती देखील मिळवू शकता आणि तुमची समस्या सहजपणे सोडवू शकतात.
अर्ज भरण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्र (सेतू) केंद्राला भेट द्या.
माऊली डिजिटल सेवा सेतू केंद्र :-
तलाठी कार्यालयाजवळ, दुर्गा देवी चौक, नेवासा, मो. 9970434665