देशातली सर्वात स्वस्त 2 Electric scooter लॉन्च ; किंमत फक्त 47,000 रु. सुरु, Driving Licence चीही गरज नाही, पहा रेंज अन् टॉप स्पीड !
इलेक्ट्रिक व्हीकल सेग्मेंट झपाट्याने वाढत आहे, विशेषत: टू – व्हीलरच्या बाबतीत, लोक अधिक स्वारस्य दाखवत आहेत. ग्राहकांच्या या आवडीमुळे, व्हीकल निर्माते देखील सतत एकापेक्षा जास्त नवीन मॉडेल्स बाजारात आणण्यासाठी उत्सुक असतात. आता GT Force ने आज देशांतर्गत बाजारात GT Soul Vegas आणि GT Drive Pro या दोन न्यू स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत.
या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर अतिशय किफायतशीर आहेत आणि दैनंदिन प्रवासासाठी एक चांगला ऑप्शन ठरणाऱ्या आहेत. GT Soul Vegas ची स्टार्टींग प्राईस फक्त 47,430 रुपये आहे तर GT Drive Pro ची स्टार्टींग प्राईस 67,208 रुपये (Ex-showroom) निश्चित करण्यात आली आहे.
GT Force चे हे दोन्ही मॉडेल लो-स्पीड स्कूटर आहेत आणि कंपनीने त्यांना लीड- अँसिड तसेच लिथियम-आयन बॅटरी पॅकसह लॉन्च केली आहे. लीड-अँसिड बॅटरी-सुसज्ज व्हेरियंट स्वस्त आहेत, तर लिथियम व्हेरिएंट थोडे अधिक महाग असणार आहे. कंपनी या स्कूटरच्या इलेक्ट्रिक मोटरवर 18 महिन्यांची वॉरंटी देत आहे. तसेच, लीड बॅटरीवर एक वर्षाची आणि लिथियम बॅटरीवर 3 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.
पॉवर आणि परफॉर्मन्स :-
नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स फक्त कमी अंतराच्या प्रवासासाठी डिझाइन केल्या आहेत, ज्याचा कमाल वेग 35 Km/h आहे. त्यामुळे या स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज लागत नाही. या स्कूटरच्या ड्रायव्हिंग रेंजबाबत असा दावा केला जात आहे की, या स्कूटर्स एका चार्जमध्ये सुमारे 60 किलोमीटरची रेंज देते.
वेगवेगळ्या बॅटरी कॉन्फिगरेशनमुळे दोन्ही स्कूटरसाठी चार्जिंगची वेळ वेगळी आहे, लीड-अँसिडसाठी 7-8 तास आणि लिथियम-आयन व्हेरिएंट पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात. या स्कूटर्समध्ये कंपनीने ब्रशलेस BLDC इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे.
GT Force स्कूटरचे व्हेरियंट आणि किंमती, पहा
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या स्कूटर भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीनुसार डिझाइन केल्या गेल्या आहेत आणि त्यांना 170 mm ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. त्यामुळे या स्कूटर सर्व प्रकारच्या रस्त्यांच्या परिस्थितीत चांगली कामगिरी करतात. दोन्ही स्कूटरची भार वाहून नेण्याची क्षमता 150 किलो आहे आणि सीटची उंची 760 mm आहे.
या मॉडेल्सची काही प्रमुख फीचर्स म्हणजे त्यांना अँटी-थेफ्ट अलार्म, रिव्हर्स मोड, क्रूझ कंट्रोल सिस्टम, इग्निशन लॉक स्टार्ट, हायड्रोलिक टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि मागील सस्पेन्शनमध्ये ड्युअल ट्यूब टेक्नॉलॉजीसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
या स्कूटर्सच्या निर्मितीमध्ये कंपनीने हाय स्ट्रेंथची ट्यूबलर फ्रेम वापरली आहे, ज्यामुळे त्यांना पुरेशी ताकद मिळते. ही स्कूटर किशोरवयीन आणि शाळा-कॉलेजात जाणाऱ्या तरुणांसाठी खास तयार करण्यात आली आहे. याशिवाय वजनाने हलके असल्याने महिलाही याचा चांगला वापर करू शकतात. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि डीलरशिपद्वारे ते बुक करू शकता…
व्हेबसाइट लिंक :- https://dezino.in/gtforce/