SECR Recruitment 2023 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागात SECR ने Apprentice (शिकाऊ) पदे भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या SECR भरतीद्वारे संस्थेत एकूण 772 पदे भरायची आहेत.
8 जून 2023 रोजी रेल्वे प्रशिक्षणार्थी भरतीसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली आहे आणि इच्छुक उमेदवार अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2023 पर्यंत स्वतःचे रजिस्ट्रेशन करू शकणार आहे. रेल्वे अप्रेंटिस भरतीची पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या अटी पुढे पाहण्यासाठी खाली दिलेले नोटिफिकेशन नक्की पहा..
वॅकन्सी डिटेल्स –
नागपूर विभागासाठी – 708 पदे
मोतीबाग कार्यशाळेसाठी – 64 पदे
अर्जाची पात्रता :-
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची किमान 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्डाकडून 50% गुणांसह समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांनी संबंधित ITI ट्रेडमध्ये नेशनल ट्रेड सर्टिफिकेट ही असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. 6 जून 2023 रोजी वयाची गणना केली जाणार आहे.
निवड प्रक्रिया :-
नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या अर्जाच्या निकषांनुसार, पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ITI प्रमाणपत्र गुण आणि 10वी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
अधिक डिटेल्ससाठी उमेदवार SECR वेबसाइट आणि येथे दिलेली भरती नोटिफिकेशन पाहू शकतात..
अर्ज करण्याची लिंक – इथे क्लिक करा
नोटिफिकेशन पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा