शेतीशिवार, 09 ऑगस्ट 2021 :- दोन महिन्यांच्या रेंजमध्ये व्यापार केल्यानंतर, भारतीय बाजारपेठाने गेल्या ट्रेडिंग आठवड्यात नवीन विक्रमी पातळी गाठली. गेल्या व्यापार आठवड्यात, बीएसई सेन्सेक्स 1,690.88 अंक (3.21 टक्के) वाढून 54,277.72 वर, तर निफ्टी 50 475.15 अंक (3 टक्के) वाढून 16,238.2 वर बंद झाला. बीएसई मिडकॅप 0.5 टक्क्यांनी वाढून बंद झाला, तर बीएसई स्मॉलकॅप स्थिर राहिला. परंतु, दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्च पातळी गाठली. गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यात बँकिंग आणि आर्थिक, ऑटो, इन्फ्रा, आयटी, ऊर्जा आणि एफएमसीजी शेअर्सवर अधिक गुंतवणूक केली. या काळात, 5 शेअर्स असे होते ज्यांनी गुंतवणूकदारांना 62 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स मिळवून दिले.
सिनेलिन इंडिया (Cinelin India) :-
सिनेलिन इंडिया ही एक अतिशय छोटी कंपनी आहे. जीची मार्केट कॅप सध्या 281.82 कोटी रुपये आहे. गेल्या आठवड्याच्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये, याचा शेअर 62.08 टक्के वाढला. हा शेअर 5 दिवसात 62.10 रुपयांवरून 100.65 रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी 7 टक्क्यांनी अधिक वाढून तो 100.65 रुपयांवर बंद झाला. 62.08 टक्के रिटर्न्स मुळे गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये सुमारे 1.62 लाख रुपयांवर गेले आहेत. पण शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम लक्षात ठेवा. नफा जितका असतो तितकाच धोका देखील असतो.
पीव्हीपी व्हेंचर्स (PVP Ventures) :-
पीव्हीपी व्हेंचर्सने गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी प्रचंड नफा कमावला. या कंपनीचा शेअर 6.18 रुपयांवरून 8.85 रुपये झाला. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना कंपनीच्या शेअर्समधून 43.20 टक्के रिटर्न्स मिळाले. या कंपनीची मार्केट कॅप 216.87 कोटी रुपये आहे. 5 दिवसात सुमारे 43.20 टक्के रिटर्न्स एफडीबरोबरच इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा कित्येक पटीने जास्त आणि चांगला आहे. शुक्रवारी, शेअर 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून 8.85 रुपयांवर बंद झाला.
ए-1 एसिड (A-1 acid) :-
रिटर्न्स देण्याच्या बाबतीतही ए -1 अॅसिडचा शेअर पुढे होता. गेल्या आठवड्यात या शेअरने 36.76 टक्के रिटर्न्स दिले. हा शेअर 148 रुपयांवरून 202.40 रुपयांवर गेला. म्हणजेच गुंतवणूकदारांना या शेअरमधून 36.76 टक्के रिटर्न्स मिळाले. या कंपनीची मार्केट कॅप 200.25 कोटी रुपये आहे. शुक्रवारी हा शेअर 18 टक्क्यांहून अधिक वाढून 36.76 रुपयांवर बंद झाला.
तिरुपति सर्जन (Tirupati Surgeon) :-
तिरुपति सर्जनने गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना खूप चांगले रिटर्न्स दिले. हा शेअर 6.89 रुपयांवरून 9.35 रुपयांवर गेला. या शेअर मधून गुंतवणूकदारांना 35.70 टक्के रिटर्न्स मिळाले. या कंपनीची मार्केट कॅप 31.05 कोटी रुपये आहे. शुक्रवारी हा शेअर 0.53 टक्क्यांनी घसरून 9.41 रुपयांवर बंद झाला.
शिवालिक बाइमेटल (Shivalik bimetal) :-
शिवालिक बाइमेटल यांनीही गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले. हा शेअर 133.00 रुपयांवरून 178.20 रुपयांवर गेला. म्हणजेच गुंतवणूकदारांना या शेअरमधून 33.98 टक्के रिटर्न्स मिळाला. या कंपनीची मार्केट कॅप 689.52 कोटी रुपये आहे. शुक्रवारी हा शेअर सुमारे 3 टक्क्यांनी घसरून 179.55 रुपयांवर बंद झाला. जर तुम्हाला तुमची संपत्ती दुप्पट करायची असेल तर शेअर बाजार त्यासाठी योग्य जागा आहे.