शेततळे अनुदान योजना : 2022 । 30X30 मी. शेततळ्यासाठी मिळवा 75 हजारापर्यंत अनुदान !

1

शेतीशिवार टीम, 11 एप्रिल 2022 :- गेल्या महिन्यात झालेल्या महाराष्ट्र अर्थसंकल्प : 2022 मध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शेतकऱ्यांना शेततळे योजनेसाठी 50 हजार एवेजी ते वाढवून 75 हजार रुपयापर्यंत अनुदान मिळण्याबाबत घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी 75 हजारांचे अनुदान मिळणार आहे.

श्वाश्वत सिंचनाचा स्रोत म्हणून शेत तळ्याकडे पाहिलं जातं, म्हणून येणाऱ्या हंगामध्ये आपल्या शेतीला श्वाश्वत सिंचनाचा स्रोत उपलब्ध असावा यासाठी शेतकरी पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेतकरी शेत तळ्याचे खोदकाम सुरु करतात. तसेच उन्हाळ्यातही मोठ्या प्रमाणावर शेततळ्यासाठी खोदकाम सुरु होतात. परंतु या शेततळ्यासाठी शासनामार्फत अनुदान मिळावं अशी शेतकऱ्याची इच्छा असते. परंतु याबाबत अर्ज कसा, कुठे करायचा / याबाबत आवश्यक काय कागदपत्रे लागतील याबद्दल त्यांना काही माहिती नसते त्यामुळे हे अनुदान त्यांच्यापर्यंत पोहचत नाही…

म्हणून आज आपण या शेततळ्याच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज / कागदपत्रे / पात्रता / लाभ / याबद्दलची सर्व माहिती ‘शेती शिवार’ च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…

शेततळे अनुदान योजना : 2022 : कागदपत्रे :-

7/12 व 8A
बँक पास बुक
आधार कार्ड
परिक्षण अहवाल
जातीचा दाखला
पासपोर्ट फोटो 

शेततळे अनुदान योजना : 2022 पात्रता :-

योजनेसाठी पात्रता या योजनेचा लाभ फक्त शेतकरीच घेऊ शकतो.
अर्जदाराच्या नावावर कमीत – कमी 1 एकर जमीन असणे आवश्यक.
ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेताचा 7/12 आणि 8-अ असावा.
लाभार्थी शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास, प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

शेत तळ्यासाठी किती मिळेल अनुदान :-

30X30X3 मीटर आकारमानाच्या शेत तळ्यासाठी 75 हजारापर्यंत अनुदान मिळेल.

15X15X3 मीटर आकारमानाच्या शेत तळ्यासाठी 35 ते 50 हजारापर्यंत अनुदान मिळेल.

तर 20X15X3 आकारमानाच्या शेततळ्यासाठी ही 50 हजारापर्यंत अनुदान मिळेल.

शेत तळ्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल ?

1) सर्व प्रथम ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच महाडीबीटी पोर्टल वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे.

2) होम पेज वर क्लिक केल्यानंतर ऑप्शनमध्ये अर्ज करा यावर क्लिक करा.

3) ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7 बाबी पर्यंत बाबी निवडायच्या आहेत ‘सिंचन साधने व सुविधा’ समोर ‘बाबी निवडा’ ऑप्शनवर क्लिक करा.

4) यानंतर तुम्हाला success दाखवलं जाईल यावर तुम्ही OK वर क्लिक करा.

5) यानंतर तुम्हाला सिंचन स्रोत निवडावा लागेल, यामध्ये तुमच्याकडे कोणतं सिंचन स्रोत आहे ते निवडा, जसे की, उपसा सिंचन / कूपनलिका / कालवा / शेततळे / विहीर / शेततळे / यापैकी तुम्ही सिंचन स्रोत निवडा…

6) यानंतर तुम्हाला ऊर्जा स्रोत निवडावा लागेल. जसे की, वीज कनेक्शन / सौर ऊर्जा चलित पपं / डिझेल चलित पपं यापैकी ऊर्जा स्रोत निवडा.

7) यानंतर तुम्हाला ‘सिंचन सुविधा व उपकरणे’ जसे की, इंजिन / इलेक्ट्रिक मोटार -सिंचन पपं / उपसा सिंचन / ठिबक / तुषार / यापैकी एक बाब निवडा.

8) यानंतर तुम्ही वापरात असलेलं उपकरण किती HP चं आहे ते निवडून त्याची संख्या लिहा..

9) यानंतर तुम्हाला ही बाब successfully ऍड झालेली दिसेल.

10) यानंतर तुम्हाला पुन्हा मुख्यपृष्ठावर जावं लागेल. मुख्यपृष्ठावर जणू पुन्हा अर्ज करा वर क्लिक करा. ‘सिंचन साधने व सुविधा’ या ‘बाबी निवडा’ ऑप्शनवर क्लिक करा.

11) यावर क्लिक केल्यानंतर आता पुन्हा अर्ज खुलेल.

12) यानंतर आपल्या प्रोफाईलची स्थिती दाखवली जाईल. यात वैयक्तिक तपशील आणि इतर सर्व माहिती व्यवस्थित भरावी जसे की, तालुका, गट/ सर्व्हे नंबर मुख्य घटक तपशील मध्ये ‘सिंचन साधने व सुविधा‘ निवडा, यानंतर बाब निवडामध्ये ‘वैयक्तिक शेततळे’ यावर क्लिक करा. त्यानंतर उपघटक मध्ये तुम्हाला
तुम्हाला कोणता प्रकार हवाय तो निवडा. यानंतर ‘साईझ निवडा’ 30X30X3 / 15X15X3 / 20X15X3 यापैकी एक ऑप्शन निवड आणि बाब जतन करा.

13) जतन केल्यानंतर तुम्हाला success झालं म्हणून एक नोटिफिकेशन दिसेल.

14) त्यानंतर तुम्हाला पुन्हा मुख्यपृष्ठ दाखवलं जाईल. आता पुन्हा तुम्हाला उजव्या साईडला ‘अर्ज सादर करा’ ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्या ऑप्शनला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल ते ok वर क्लिक करावे लागेल. एकदा ok वर क्लिक केल्यानंतर दुसरी बाब ऍड करू शकत नाही, बदल करायचा असेल तर पूर्ण अर्ज रद्द करावा लागतो. त्यामुळे काळजीपूर्वक सर्व करा.

15) यानंतर तुम्हाला ‘पहा’ या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्ही ज्या योजनांसाठी अर्ज केला असेल ते सांगळे अर्ज दिसेल त्याला प्राधान्य क्रम द्या.आणि ‘अर्ज सादर करा’ वर क्लिक करा.

16) क्लिक केल्या नंतर पुढे आपणाला दुसऱ्या पेज वर redirect केले जाईल या पेज वर आपणाला make payment चे ऑपशन दाखवला जाईल. इथे आपण 23.60 रुपयांचं payment करू शकता.

17) payment करण्यासाठी आपणाला बरेच ऑपशन दाखवले जातील UPI , Wallet , net banking , IMPS यापैकी आपल्याला ज्या प्रकारे payment करायची आहे ते ऑपशन निवडून तुम्ही payment करू शकता…

अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल…

शेतकरी बांधवानो आपण शेतीशिवार च्या माध्यमातून ज्या काही लेटेस्ट योजनांचे अपडेट जाणून घेत आहोत या सर्व योजना खऱ्या आहेत. प्रत्येक योजनेच्या मुळापर्यंत तुम्हाला पोहचता आलं तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल वरून फॉर्म भरण्यास काही अडचण येत असेल तर आपली ‘शेतीशिवार’ ची बातमी आणि तुमचे कागदपत्रे घेऊन जवळच्या जनसेवा केंद्र ( सेतू ) ला भेट द्या, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन सबमिट करू शकता… 

1 Comment
  1. […] शेततळ्यासाठी 75 हजारापर्यंत अनुदान अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा  […]

Leave A Reply

Your email address will not be published.