लॉन्च होताच या सेडान Car ची जबरदस्त डिमांड ; महिनाभरात 10,000 हजारांहून बुकिंग ; टेस्ट ड्राइव्हरचं लोकं फिदा !
शेतीशिवार टीम, 5 एप्रिल 2022 :- स्कोडा (ŠKODA) कंपनीने त्यांचं स्लाव्हिया (Slavia) मॉडेल भारतात अधिकृत लॉन्च केल्याच्या एकाचं महिन्यात या मॉडेलने 10,000 बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे. स्लाव्हिया ही सेडान कार 28 फेब्रुवारी रोजी भारतात लॉन्च करण्यात आली होती. या कारच्या दमदार परफॉर्मन्स मुळे ग्राहकांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत आहे. ग्राहक या कार च्या टेस्ट ड्राईव्ह खूपच फिदा होताना दिसून येत आहे.
कंपनीने म्हटले आहे की, मार्च 2022 मध्ये स्लाव्हिया (Slavia) 5,608 वाहनांची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षी मार्चमध्ये विकल्या गेलेल्या 1,159 वाहनांपेक्षा पाचपट जास्त आहे. या वाहनाची किंमत 10.69 लाख रुपयांपासून सुरू होऊन 15.39 लाख रुपयांपर्यंत (Ex-showroom) जाते.
इंजिन :-
स्कोडा स्लाव्हियाचे (Slavia) 1.0-लिटर, 3-सिलेंडर TSI इंजिन 115 bhp पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करतं. या सेडानचे 1.5-लिटर, 4-सिलेंडर TSI पेट्रोल इंजिन 150 bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. पहिलं इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. तर दुसरे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं आहे.
फीचर्स :-
स्कोडा स्लाव्हियाचे (Slavia) इंटेरिअर फीचर्स लोडेल आहे. या सेडानमध्ये 8 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. याशिवाय वायरलेस चार्जिंग पॅड, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड सीट, ऑटो डिमिंग IRVM, कीलेस एंट्री आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांसारखे फीचर्स देण्यात आले आहे.
कंपनीने ही कार मल्टिपल कलर ऑप्शन्समध्ये आणली आहे, परंतु ग्राहकांकडून सर्वात जास्त पसंती ही ब्लू आणि रेड कलरला दिली गेली आहे. फ्रंट साईडला हेक्सागोनल ग्रिल, L-आकाराचे LED DRLs सह LED प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि क्रोम सराउंडसह फॉग लॅम्प्स मिळतात.
साईडला, तुम्हाला लांब व्हील बेससह 16-इंच अलॉय व्हील, फ्रंट फेंडर्सवर ‘SKODA’ बॅजिंग आणि ऑटो-फोल्ड फंक्शनसह ORVM मिळतात. बॅक साईडला स्प्लिट डिझाइनसह एलईडी टेललॅम्प उपलब्ध आहेत. ‘स्कोडा’ चे बॅजिंग बूटच्या मध्यभागी दिलेले आहे.
ओनरशिप किंमत फक्त 46 पैसे / किमी !
या स्कोडा कारचे आतापर्यंत 10,000 हजार ग्राहकांनी बुकिंग केले आहे. कंपनीने या कारवर 4 मेंटेनन्स पॅक दिले आहेत ज्यात या ओनरशिप किंमत 46 पैसे /किमी असल्याचा दावा केला आहे. या पॅकेजेसमध्ये कारचे स्पेयर पार्ट्स,, इंजिन ऑइल आणि लेबर कॉस्ट समाविष्ट करण्यात आला आहे, या पॅकेजची किंमत 24,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.