शेतीशिवार टीम, 5 एप्रिल 2022 :- CNG / PNG वाहन धारकांना महानगर गॅसने मोठा झटका दिला आहे. आज मध्यरात्रीपासून CNG / PNG च्या दारांत मोठी वाढ होणार आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या CNG / PNG वाहन धारकांना राज्य सरकारने दिलासा देत सीएनजी (CNG) वरील व्हॅट (VAT) 13.50% कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुले सीएनजी गॅसच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळत होते.परंतु आज मध्यरात्रीपासून CNG / PNG च्या दरांत वाढ होणार आहे.
मुंबईत मंगळवारी म्हणजे आज मध्यरात्रीपासून CNG आणि PNG च्या किमती वाढणार आहेत. CNG ची किंमतत 7 रुपयांची वाढ केली जाणार असून प्रति किलो CNG चे दर 67 रुपयांवर पोहचणार आहे.
तर PNG च्या किमतीत 5 रुपयांची वाढ होणार असून PNG चे दर 41 / SCM रुपायंवर पोहचणार आहे. PNG घरगुती तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी वापरला जातो.
आज मंगळवारी नवी दिल्लीतही सीएनजीची (CNG) किंमत प्रति किलो 2.5 रुपयांनी वाढून 64.11 रुपये प्रति किलो झाली आहे.
सीएनजीच्या (CNG) किमती वाढल्याने ओला आणि उबेर सारख्या राइड हेलर्सच्या ऑपरेशनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सीएनजीच्या (CNG) दरात झालेली वाढ पाहता, आता प्रवासही महागणार आहे.
आज मंगळवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली. गेल्या दोन आठवड्यात एकूण 9.20 रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी जारी केलेल्या किमतीनुसार, भारताची आर्थिक राजधानीत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 119.67 ₹/L रुपये डिझेलची किंमत 103.92 ₹/L प्रति लीटरवर पोहचली आहे.
विरोधकांनी निदर्शने करून ही इंधनाचे दर वाढल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे. महागाईच्या विरोधात काँग्रेस देशव्यापी मुक निषेध मोहीम ‘महंगाई मुक्त भारत अभियान’ राबवत असून त्याअंतर्गत ते 7 एप्रिलपर्यंत देशभरात मोर्चे काढले जाणार आहे.