Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल -डिझेलच्या दरांनी घेतला पेट, पेट्रोल 10 रुपयांनी महागलं !

0

शेतीशिवार टीम, 6 एप्रिल 2022 :- भारतात महागाईने आता कळस गाठला असून मध्यमवर्गीय आणि हातावर पोट असणाऱ्यांचे जगणं तर कठीण झालंय,पण रोज – रोज पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे.आज इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. बुधवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली. या वाढीनंतर 16 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 10 रुपयांनी वाढ झाली आहे.

देशातील सर्वात जास्त दराने पेट्रोल हे परभणी जिल्ह्यात मिळत आहे. परभणीमध्ये 123.47 रुपये प्रति लिटरवर पेट्रोल पोहचलं आहे.तर डिझेल 106.04 रुपये दराने मिळत आहे.

बुधवारी मेट्रो शहरांमधील सर्वात महाग पेट्रोल मुंबईत विकले जात आहे, तर सर्वात महाग डिझेल हैदराबादमध्ये 105.49 रुपये प्रति लीटर आहे. जर देशाबद्दल बोलायचे झाले तर, आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल सर्वात महाग म्हणजे 107.11 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तसेच, राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पेट्रोलची किंमत सर्वाधिक म्हणजे 122.93 रुपये प्रति लिटर आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 104.61 रुपयांवरून 105.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.87 रुपयांवरून 96.67 रुपये प्रति लिटर झाला आहे.

मुंबई आणि ठाण्यात पेट्रोल आतापर्यंतच्या उच्चांकावर…

बुधवारी मुंबई आणि ठाण्यात पेट्रोलने 120 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक ओलांडला. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 120.51 रुपये होता, तर एक लिटर डिझेलचा दर 104.77 रुपयांवर गेला आहे. तसेच, ठाण्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 120.65 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 104.90 रुपये आहे.

येथे पेट्रोल आणि डिझेलमध्ये अनुक्रमे 84 पैसे आणि 85 पैशांची वाढ झाली आहे. यापूर्वी, 3 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोलचा दर 115.85 रुपये प्रति लिटर होता, तर डिझेलचा दर 106.62 रुपये प्रति लिटर होता.

16 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 10 रुपयांची वाढ…

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करानुसार त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. जवळपास 137 दिवस स्थिर राहिल्यानंतर 22 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 14व्यांदा दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांनी वाढ झाली आहे…

CNG / PNG दरातही मोठी वाढ…

CNG / PNG वाहन धारकांना महानगर गॅसने मोठा झटका दिला आहे. आज मध्यरात्रीपासून CNG / PNG च्या दारांत मोठी वाढ होणार आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या CNG / PNG वाहन धारकांना राज्य सरकारने दिलासा देत सीएनजी (CNG) वरील व्हॅट (VAT) 13.50% कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुले सीएनजी गॅसच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळत होते.परंतु आज मध्यरात्रीपासून CNG / PNG च्या दरांत वाढ होणार आहे.

मुंबईत मंगळवारी म्हणजे आज मध्यरात्रीपासून CNG आणि PNG च्या किमती वाढणार आहेत. CNG ची किंमतत 7 रुपयांची वाढ केली जाणार असून प्रति किलो CNG चे दर 67 रुपयांवर पोहचणार आहे.

तर PNG च्या किमतीत 5 रुपयांची वाढ होणार असून PNG चे दर 41 / SCM रुपायंवर पोहचणार आहे. PNG घरगुती तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी वापरला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.