शेतीशिवार टीम : 12 सप्टेंबर 2022 :- निसर्गाचा लहरीपणा, दुष्काळाची दाहकता या सर्वांवर मात करत शेतकऱ्याला सिंचनाचे महत्त्वाचे असे साधन म्हणून पाहिली जाणारी योजना म्हणजे ‘शेततळे योजना’ शेततळ्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून अनुदान दिलं जातं. यामध्ये महत्त्वाची योजना म्हणजे ‘एकात्मिक फलोत्पादन’ या अंतर्गत शेतकऱ्यांना सामूहिक शेततळ्यासाठी, वैयक्तिक शेततळ्यासाठी याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजने-अंतर्गत बनवलेल्या शेततळ्यामध्ये पाण्याचा संचय होऊन प्लास्टिक अस्तरीकरणासाठी देखील अनुदान दिलं जातं.

यासाठी 2022-23 करता सामूहिक शेततळे अनुदान व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी अर्ज सुरू झाले असून राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून प्रेस नोट जारी करून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तर आज आपण या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा ? अनुदान किती मिळतं ? कागदपत्रे, पात्रता, किती मीटर साईजला किती अनुदान ? या बद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत…

*** एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23

सामूहिक शेततळे योजना :-

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामूहिक शेततळे हा घटक फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे व दुष्काळी भागामध्ये फलोत्पादन पिकाच्या क्षेत्रा विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे या उद्देशाने 100% अनुदानावर राबविण्यात येत आहे. सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे अनुदान देय आहे. सामूहिक शेततळे घटकासाठी आकारमाननिहाय देय अनुदान पुढीलप्रमाणे….

सामूहिक शेततळ्यासाठी अनुदान आणि साईझ ( मीटरमध्ये) पहा

[table id=1 /]

टीप :- सामूहिक शेततळ्यासाठी 2 किंवा त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सहभाग असावा…

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण :-

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण हा घटक पाण्याचा साठा निर्माण करणे. व साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने 50% अनुदानावर राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना शेततळ्याच्या आकारमाननिहाय पुढीलप्रमाणे अनुदान देय आहे.

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या घटकासाठी आकारमाननिहाय देय अनुदान पुढीलप्रमाणे :

[table id=2 /]

शेततळे अनुदान योजना : 2022 : कागदपत्रे :-

7/12 व 8A
बँक पास बुक
आधार कार्ड
परिक्षण अहवाल
जातीचा दाखला
पासपोर्ट फोटो

शेत तळ्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल ?

1) सर्व प्रथम ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच महाडीबीटी पोर्टल वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे.

2) होम पेज वर क्लिक केल्यानंतर ऑप्शनमध्ये अर्ज करा यावर क्लिक करा.

3) ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7 बाबी पर्यंत बाबी निवडायच्या आहेत ‘सिंचन साधने व सुविधा’ समोर ‘बाबी निवडा’ ऑप्शनवर क्लिक करा.

4) यानंतर तुम्हाला success दाखवलं जाईल यावर तुम्ही OK वर क्लिक करा.

5) यानंतर तुम्हाला सिंचन स्रोत निवडावा लागेल, यामध्ये तुमच्याकडे कोणतं सिंचन स्रोत आहे ते निवडा, जसे की, उपसा सिंचन / कूपनलिका / कालवा / शेततळे / विहीर / शेततळे / यापैकी तुम्ही सिंचन स्रोत निवडा…

6) यानंतर तुम्हाला ऊर्जा स्रोत निवडावा लागेल. जसे की, वीज कनेक्शन / सौर ऊर्जा चलित पपं / डिझेल चलित पपं यापैकी ऊर्जा स्रोत निवडा.

7) यानंतर तुम्हाला ‘सिंचन सुविधा व उपकरणे’ जसे की, इंजिन / इलेक्ट्रिक मोटार -सिंचन पपं / उपसा सिंचन / ठिबक / तुषार / यापैकी एक बाब निवडा.

8) यानंतर तुम्ही वापरात असलेलं उपकरण किती HP चं आहे ते निवडून त्याची संख्या लिहा..

9) यानंतर तुम्हाला ही बाब successfully अँड झालेली दिसेल.

10) यानंतर तुम्हाला पुन्हा मुख्यपृष्ठावर जावं लागेल. मुख्यपृष्ठावर जणू पुन्हा अर्ज करा वर क्लिक करा. ‘सिंचन साधने व सुविधा’ या ‘बाबी निवडा’ ऑप्शनवर क्लिक करा.

11) यावर क्लिक केल्यानंतर आता पुन्हा अर्ज खुलेल.

12) यानंतर आपल्या प्रोफाईलची स्थिती दाखवली जाईल. यात वैयक्तिक तपशील आणि इतर सर्व माहिती व्यवस्थित भरावी जसे की, तालुका, गट/ सर्व्हे नंबर मुख्य घटक तपशील मध्ये ‘सिंचन साधने व सुविधा‘ निवडा, यानंतर बाब निवडामध्ये ‘वैयक्तिक शेततळे’ यावर क्लिक करा. जर सामूहिक शेततळे हवं असेल तर सामूहिक शेततळे’ वर क्लिक करा. त्यानंतर उपघटक मध्ये तुम्हाला तुम्हाला कोणता प्रकार हवाय तो निवडा. यानंतर ‘साईझ निवडा’ 30X30X3 / 15X15X3 / 20X15X3 यापैकी एक ऑप्शन निवड आणि बाब जतन करा.

13) जतन केल्यानंतर तुम्हाला success झालं म्हणून एक नोटिफिकेशन दिसेल.

14) त्यानंतर तुम्हाला पुन्हा मुख्यपृष्ठ दाखवलं जाईल. आता पुन्हा तुम्हाला उजव्या साईडला ‘अर्ज सादर करा’ ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्या ऑप्शनला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल ते ok वर क्लिक करावे लागेल. एकदा ok वर क्लिक केल्यानंतर दुसरी बाब ऍड करू शकत नाही, बदल करायचा असेल तर पूर्ण अर्ज रद्द करावा लागतो. त्यामुळे काळजीपूर्वक सर्व करा.

15) यानंतर तुम्हाला ‘पहा’ या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्ही ज्या योजनांसाठी अर्ज केला असेल ते सांगळे अर्ज दिसेल त्याला प्राधान्य क्रम द्या.आणि ‘अर्ज सादर करा’ वर क्लिक करा.

16) क्लिक केल्या नंतर पुढे आपणाला दुसऱ्या पेज वर redirect केले जाईल या पेज वर आपणाला make payment चे ऑपशन दाखवला जाईल. इथे आपण 23.60 रुपयांचं payment करू शकता.

17) payment करण्यासाठी आपणाला बरेच ऑपशन दाखवले जातील UPI , Wallet , net banking , IMPS यापैकी आपल्याला ज्या प्रकारे payment करायची आहे ते ऑपशन निवडून तुम्ही payment करू शकता…

अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *