खुशखबर! शेततळ्यासाठी आता दीड लाखांचे अनुदान, कृषी विभागाकडून अर्जाचे आवाहन, पहा आकारमान चार्टसह ऑनलाईन अर्ज प्रोसेस..
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही बाब महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित करण्यात आली आहे. महाडीबीटी पोर्टलच्या या संकेतस्थळावर वैयक्तिक शेततळयासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिराशे यांनी केले आहे.
योजनेअंतर्गत शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावे किमान 0.60 हेक्टर जमीन असावी, यासाठी कमाल क्षेत्र मर्यादा नाही तसेच अर्जदारांनी यापूर्वी कोणत्याही योजनेतून शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा.
शेततळ्याचे आकारमान 15x15x3 मीटरपासून 34x34x3 मीटरपर्यंत राहील..
अनुदान आकारमानानुसार जास्तीत जास्त 75 हजार रू. पर्यंत राहील. यापूर्वी मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी 50 हजार हजार रुपये पर्यंत अनुदान होते, मात्र आता यामध्ये वाढ करून मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत शेततळे खोदकामासाठी 75 हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
जर शेतकऱ्यांनी अस्तरीकरणासह अर्ज केल्यास आकारमानानुसार जास्तीत जास्त 1 लाख 50 हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे. अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिराशे यांनी केले.
आवश्यक कागदपत्रे :-
जमीनीचा सात-बारा आणि 8-अ उतारा
आधारकार्ड झेरॉक्स
बँक पासबुक झेरॉक्स
हमीपत्र आणि जातीचा दाखला
पासपोर्ट फोटो
वैयक्तिक शेततळे घटकासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा कराल ?
‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच महाडीबीटी पोर्टल वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे..
होम पेजवर आल्यानंतर ‘अर्ज करा’ ऑप्शनवर क्लिक करा.
वैयक्तिक शेततळे घटकासाठी ‘सिंचन साधने व सुविधा’ या टाईटल अंतर्गत वैयक्तिक शेततळे ही बाब निवडण्यात यावी.
यानंतर इनलेट आणि आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेट शिवाय पुढे (with inlet-outlet/without inlet-outlet) यापैकी एक उपघटक निवडण्यात यावा.
त्यानंतर शेततळे आकारमान व स्लोप निवडण्यात यावा. याप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सदर लाभार्थ्यांची महाडबीटी पोर्टलद्वारे लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल..
टीप : मोबाईलवर अर्ज करण्यास काही अडथळा येत असेल जवळच्या जनसेवा केंद्र ( सेतू ) ला भेट द्या..