Take a fresh look at your lifestyle.

शिरूर शहरासह तालुक्याला मोठा धक्का ; ‘गरीबांचे डॉक्टर’ असा नावलौकिक असलेले डॉ. दिनेश शहा यांचे निधन

0

शेतीशिवार टीम : 26 सप्टेंबर 2022 :- शिरूर शहरातून आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गरीबांचे डॉक्टर’ असा नावलौकिक मिळविलेले शहरातील सर्वांत परिचित असलेले डॉ.दिनेश प्रवीणचंदजी शहा (B.H.M.S, Homeopathy) वय -53 यांचे आज मध्यरात्री 2 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

प्रचंड अनुभव आणि समयसूचकता सर्वसामान्य माणसांची जान आणि सहानुभूती असलेले डॉ. शहा हे ‘गरीबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध होते. शिरूर ,श्रीगोंदा आणि पारनेर येथील गरीब ,शेतकरी मजूर, कष्टकरी, बहुजनांसाठी अत्यंत माफक दारात ते उपचार करत होते.

आज हॉस्पिटल म्हणजे मोठा खर्च आणि लागणारा पैसा हे समीकरण ठरलेले आहे. शिरूर शहरात इतके नामांकित डॉक्टर अन् त्यांची फीस 200 ते 300 च्या घरात असताना डॉ. शहा फक्त 50 रुपयात उपचार करत होते.

त्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडणारं होतं. रोज जवळपास 300 अधिक रुग्णांना ते सेवा देत होते. उपचार करताच लगेच गुणही येत होता त्यामुळे शिरूर तालुक्यासह, पारनेर, श्रीगोंदा पंचक्रोशीमधील सर्वसामान्य लोक त्यांच्याकडून उपचार घेत असे.

काल रात्री 9: 30 नंतर त्यांनी दवाखाना बंद केल्यानंतर घरी गेले. त्यानंतर अचानक मध्यरात्री 2 वाजता अचानक त्यांच्या छातीत दुखू लागण्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. हॉस्पिटलला नेले असता त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या जाण्याने शिरूर शहरासह तालुक्यात शोककळा पसरली असून मोठी हानी झाली आहे.

सर्वसामान्य माणसांना माफक उपचार देणारा गरिबांचा देव पुन्हा जन्माला येणे नाही…..अशी सर्वसामान्यांत भावना निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.