शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता वर्ग-2 च्या जमीन धारकांनाही मिळणार जामीनदाराविना कर्ज; पहा नियम व अटी…

0

अहमदनगर : वर्ग दोनच्या जमीन (Class II lands) धारकांसाठी शेती कर्ज मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी येत होत्या. त्यांना कोणी जामीनही व्हायला तयार नव्हते. याबाबत शेतकरी संघटनेने जिल्हा बँक येथे गेल्या आठ दिवसापूर्वी अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून पाठपुरावा केला होता.

त्यावर संचालक मंडळाने बैठक घेऊन जामीन दाराशिवाय कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संचालक मंडळाच्या 28 जून रोजी झालेल्या बैठकीत या शेतकऱ्यांना पीक कर्ज व पशुपालन खेळते भांडवल कर्ज वाटप करण्याबाबत धोरण व अटीस अधिन राहून निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सर्व वर्ग 2 जमीन धारकांसाठी कर्ज मिळणे सुलभ होणार आहे.

श्रीरामपूर तालुक्यात अनेक खंडकरी शेतकऱ्यांना मोठ्या जमिनी मिळाल्या असून त्याची नोंद वर्ग 2 मध्ये आहे. त्यामध्ये शेकडो एकर ऊस लागवड झालेली आहे. मात्र, उद्या जर या शेतकऱ्यांचे कर्ज थकले, तर आपल्याकडून वसुली होईल या भीतीने जामीन होण्यास इतर शेतकरी तयार होत नसल्याने अडचणी येत होत्या. याबाबत संचालक मंडळाची शुक्रवारी 19 ऑगस्ट रोजी संचालक मंडळाची बैठक होऊन सदर बैठकीमध्ये वर्ग दोन जमीन धारकांना कर्जपुरवठा करताना कोणत्याही प्रकारच्या जामीनदार देण्याची गरज नाही अशा स्वरूपाचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला.

मात्र, त्यांचे सोसायटीचे इकरार पत्र होणे आवश्यक आहे ही अट घालण्यात आली. 12 ऑगस्ट रोजी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही बँक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता.

सहकारी संस्था व शाखांकडून प्राप्त झालेले भोगवटादार नंबर 2 धारणा प्रकारातील नवीन सभासदांचे प्रस्ताव बँकेच्या प्रचलित धोरणानुसार कागदपत्राची पुर्तता करून घेऊन तालुका विकास अधिकारी यांनी कर्ज वाटपास परवानगी देण्यात आली आहे. सभासदांना वर्ग 2 च्या जमिनीवर कर्ज वाटप करताना प्रथम इकरार नोंदवून घेतल्यानंतर व नंतरच कर्ज वाटप करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पहा, नियम व अटी :-

भोगवटादार नंबर 2 च्या जमीनीच्या 7/12 उताऱ्यावर सभासदाचे नाव कब्जेदार सदरी असावे, तसेच 8 अ वर सभासदाचे मालकीचे क्षेत्र नमूद असावे,

7/12 उताऱ्यावर लागवडी योग्य क्षेत्र अशी नोंद असणे आवश्यक आहे. तसेच आकार किंवा जुडी याचीही नोंद असणे आवश्यक आहे. अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

सर्व तालुका विकास अधिकारी, शाखाधिकारी इनपेक्टर तसेच प्राथमिक वि.का.सेवा संस्थांचे सचिव यांना कळविण्याचे की, भोगवटा नं. 2 जमीन धारणा प्रकारातील मालकी असणाऱ्या शेतकरी सभासदांना अल्पमुदत पिक कर्ज वाटप करणेसंबंधी हेड ऑफिस परिपत्रक जा.क्र.शेतीकर्ज / एमएस / 24 / 258 दि. 28 / 6 / 2022 अन्वये अनुक्रमे 1 ते 9 अटींची पूर्तता करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.

सदर परिपत्रकामधील अट क्र. २ बायत मा.युटिव्ह कमिटी सभा दि.19 / 8 / 2022 ठराव नं. 24 अन्वये खालीलप्रमाणे कार्यवाही करावी असे ठरविण्यात आलेले आहे.

1 ) भोगवटादार नं. 2 जमीन धारणा प्रकारातील मालकी असणारे शेतकरी सभासदांना अल्पमुदत पिक कर्ज वाटप करतांना भोगवटा वर्ग- 2 जमीनीवर प्रथम श्रेणीचा इकरार नोंद करून घेवून नोंद केलेल्या फेरफारसह 7/12 उतारा शाखा दप्तरी ठेवुन बँक कर्ज धोरणानुसार कर्जण करावे, असे कर्ज वितरण करतांना 1 लायक जामीनदाराचे रू. 100/- चे स्टॅम्प पेपरवर हमीपत्र घेवु नये तसेच उपरोक्त संदर्भ क्र. 1 नुसार कळविलेल्या अट. क्र. 1 व 3 ते 9 ची पुर्तता करून घेण्यात यावी.

2) भोगवटा वर्ग 2 जमीन धारकास अल्पमुदत पिक कर्ज वितरण करतांना 7/12 उतान्यावर इकरारची नोंद होत नाही अशा शेतकऱ्यांना उपरोक्त संदर्भ क्र.3 नुसार 1 लायक जामीनदाराचे रु.100 /- चे स्टॅम्पपेपरवर हमीपत्र घेथुन कर्ज वितरण करावे.असे कर्ज वितरण करतांना उपरोक्त संदर्भ क्र.1 नुसार अट क्र.9 ची पुर्तता करून कर्ज वितरण करावे.

3 ) महामार्ग प्राधिकरण, एमआयडीच्या विस्तारीकरणासाठी रेल्वे मार्गाकरीता संपादित केलेला गट नंबर भोगवटा वर्ग 2 समजुन उपरोक्त मुद्दा क्र.1 किंवा 2 नुसार कार्यवाही करून कर्ज वितरण करावे.

इकरार पत्र होणे आवश्यक : वर्पे

याबाबत जिल्हा सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, जमीनदाराशिवाय वर्ग दोनच्या जमिनीवर कर्ज देण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. मात्र, ज्यांचे सहकारी सोसायटीत इकरार पत्र होईल, त्यांना कर्ज पुरवठा होईल, असे सांगितले. दरम्यान, यासंदर्भात दैनिक दिव्य मराठीच्या पाठपुराव्याला यश आले आहेे.

Leave A Reply

Your email address will not be published.