शेतीशिवार टीम :- सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. यासाठी सरकारने पशु किसान क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. शेतकऱ्यांना मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळ्या, गायी आणि म्हशी पालनासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड (Pashu Kisan Credit Card) योजनेअंतर्गत कर्ज दिलं जातं. ही किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकारने राज्य सरकारच्या साहाय्याने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे.

हे कर्ज शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पशुपालनाला चालना देण्यासाठी दिले जात आहे. पशुधन किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कार्डधारक शेतकरी पशुपालकांसाठी 1.60 लाख रुपयांचे पशुधन कर्ज कोणत्याही गॅरंटीशिवाय 7% व्याजदराने मिळू शकतं.

पशुधन किसान क्रेडिट अंतर्गत कार्डधारक पशुपालकांना 3% व्याजाची सूट मिळते. या योजनेत ज्या शेतकऱ्यांना एक क्रेडिट कार्ड दिलं जातं, ते शेतकरी हे क्रेडिट कार्ड बँकेत डेबिट कार्ड म्हणून वापरू शकतात. या क्रेडिट कार्ड अंतर्गत, पशुपालकांना म्हशीसाठी – ₹ 60,249/- । गायीसाठी ₹40,783/- । मेंढ्या आणि शेळ्यांसाठी – ₹ 4,063/- । डुकरांसाठी ₹16327/- कुक्कुटपालनासाठी- ₹ 720/- कर्ज घेऊ शकतात. व्याजाची रक्कम एका वर्षाच्या अंतराने ठरविक वेळी भरावी लागेल ती रक्कम फिटल्यानंतर तो लाभार्थी पुढील कर्जासाठी पात्र असेल.

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 1.60 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारलं जातं नाही. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 7% व्याजदराने कर्ज दिलं जातं. यामध्ये केंद्र सरकार 3% अनुदान देते, तर राज्य सरकार 4% सवलत देते. अशाप्रकारे क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत घेतलेले कर्ज व्याजाविरहित असतं.

तीन लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्यास पशुपालकांना 12% व्याजा दराने कर्ज मिळतं. व्याजाची रक्कम एका वर्षाच्या अंतराने भरावी लागेल, त्यानंतरच पुढील रक्कम त्याला दिली जाईल.

पशू किसान क्रेडिट कार्ड स्कीम : 2022 ची कागदपत्रे (पात्रता) :-

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
पशूचे हेल्थ सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
ज्या जनावरांचा विमा काढला आहे, त्यांना हे कर्ज मिळेल.
कर्ज घेताना सिव्हिल स्कोर चांगला असावा.
अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो

पशु किसान क्रेडिट कार्ड : 2022 साठी अर्ज कसा कराल ?

पशु किसान क्रेडिट कार्ड PDF अर्ज डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा

राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या योजनेअंतर्गत पशु क्रेडिट कार्ड मिळवायचे आहे, त्यांनी त्यांच्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह बँकेत जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तिथे जाऊन अर्ज भरावा लागेल.

त्यानंतर Application Form मध्ये विरलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला Adhaar card, Pan card, Voter id card चे झेरॉक्स अर्जासोबत जोडा आणि बँक अधिकाऱ्याकडे जमा करा.

अर्जाची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला 1 महिन्याच्या आत Pashu Kisan Credit Card दिलं जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *