शेतीशिवार टीम, 10 जानेवारी 2022 : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकार रोज नवनवीन पावलं उचलत आहे. दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कोरोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या तपासणीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत.
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा आणि तो इतरांमध्ये वेगाने पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे कोरोना रुग्ण सापडला की त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जातो आणि त्यांचीही कोरोना टेस्ट केली जाते. पण आता याबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोना टेस्ट बाबत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोणत्या व्यक्तीची कोरोना टेस्ट कऱण्याची गरज नाही याची त्यांनी यादी दिली आहे. यामध्ये खालील लोकांचा समावेश आहे.
1) सार्वजनिक ठिकाणी राहणआरे लक्षणं नसलेले लोक.
2) कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले पण ज्यांना जास्त धोका नाही, म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे. आजारी नाहीत असे लोक.
3) होम आयसोलेशनच्या गाइडलाइन्सनुसार डिस्चार्ज मिळालेले लोक
4) रुग्णालयाच्या डिस्चार्ज पॉलिसीनुसार कोविड-19 केंद्रातून डिस्चार्ज मिळालेले लोक.
5) एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणारे नागरिक.
तर टेस्ट करणार्यांनी RT-PCR, TrueNat, CBNAAT, Crisper, RT-LAMP, रॅपिड मॉलेक्युलर टेस्टिंग सिस्टीम किंवा रॅपिड अँटीजेन टेस्टचा वापर करण्यास सांगितलं आहे.
आज राज्यासह मुंबईला मोठा दिलासा :-
मुंबईसह आज राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांत काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 33 हजार 470 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत जवळपास 10 हजारांनी घट झाली आहे. रविवारी राज्यात 44 हजार 388 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
तर मुंबईत कोरोनाचे 13648 नवे रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली आहे.