शेतीशिवार टीम, 10 जानेवारी 2022 : कोरोनाच्या या कठीण काळातही असे बरेच स्टॉक्स आहेत ज्यांनी भव्य-दिव्य रिटर्न दिला आहे. अशीच एक कंपनी GRM Overseas या कंपनीने गेल्या तीन महिन्यांत शेअरच्या किमतीत जवळपास 300% वाढ झाली आहे. म्हणजेच अवघ्या तीन महिन्यांत गुंतवणूकदारांचे नशीब पालटलं आहे.

भारतातील सर्वात मोठा बासमती तांदूळ उत्पादक GRM Overseasच्या एका शेअरची किंमत 11 ऑक्टोबर 2021 रोजी 209.28 रुपये होती. जी 3 महिन्यांत 815.35 रुपयांपर्यंत वाढली आहे.

या कंपनीने Udaan India बरोबर हातमिळवणी केल्यावर शेअरच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली. आम्ही तुम्हाला सांगतो, Udaan India ई-काॅमर्सच्या (E-commerce) बाबतीत देशातील आघाडीची कंपनी आहे.

कशी वाढली शेअर्सची किंमत ?

GRM Overseasने गेल्या काही महिन्यांत चांगला रिटर्न्स दिला आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरची किंमत 459.50 रुपयांवरून 815.35 रुपयांपर्यंत वाढली आहे. तसेच गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या एका शेअरची किंमत 160 रुपयांवरून 815 रुपयांपर्यंत वाढली आहे. तर वर्षभरापूर्वी शेअरची किंमत फक्त 38 रुपये होती. तेव्हापासून कंपनीच्या शेअरची किंमत 2,000% वाढ झाली आहे.

गुंतवणुकीवर काय झाला परिणाम ?

जर एखाद्याने महिन्यापूर्वी GRM Overseasमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज ते 1.75 लाख रुपये झाले असते. त्याच वेळी, 6 महिन्यांपूर्वी केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज 5 लाख झाली असती. जर एखाद्या इंवेस्टरने वर्षभरापूर्वी या कंपनीमध्ये 1 लाख गुंतवले असते तर त्याचे 21 लाख झाले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *