शेतीशिवार टीम, 10 जानेवारी 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी रोजी पीएम किसान योजनेंतर्गत 10 वा हप्ता 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला आहे. अजूनही अनेक शेतकरी आहेत ज्यांना 10वा हप्ता मिळाला नाहीये. आपल्या खात्यात हप्ता का आला नाही, अशी चिंता अशा शेतकऱ्यांना सतावत आहे. 31 मार्चपर्यंत शिल्लक राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डिसेंबर-मार्चचा हप्ता येतच राहणार असल्याने तुम्ही नाराज होऊ नका.
पीएम किसान पोर्टलवर दिलेल्या आकडेवारीनुसार, 12.44 कोटीहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून 9 जानेवारीपर्यंत ही रक्कम 10,51,95,002 शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली आहे. तुमची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही या मोबाईल नंबर आणि हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता.
10 कोटी शेतकऱ्यांना हप्ता पोहचला.
मोदी सरकारने देशभरातील 10.09 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 20,900 रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली आहे. तुमच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत, तर तुम्ही या क्रमांकांवर तक्रार करू शकता.
नोंदणीकृत शेतकरी या क्रमांकावर तक्रार करू शकतात….
अनेकांची नावे आधीच्या यादीत होती, मात्र नवीन यादीत नाही. मागच्या वेळी पैसे आले पण यावेळी आले नाहीत, तर तुम्ही पीएम किसान सन्मानच्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार नोंदवू शकता. यासाठी तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करू शकता.
याप्रमाणे मंत्रालयाशी संपर्क साधा :-
पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261
पीएम किसान लँडलाइन क्रमांक : 011-23381092, 23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे : 0120-6025109
ई-मेल आयडी : pmkisan-ict@gov.in