MPSC Interview 17 Questions : अशी कोणती गोष्ट आहे, जी महिन्यातून एकदा येते अन् 24 तासानंतर निघून जाते ?
शेतीशिवार टीम, 2 फेब्रुवारी 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न : सूर्य कोणत्या गॅस पासून बनलेला गोळा आहे ?
उत्तर : हायड्रोजन आणि हेलियम
प्रश्न : भारतीय हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे ?
उत्तर : दिल्ली
प्रश्न : असा कोठा देश आहे तिथे सर्वात शुद्ध पाणी आढळतं ?
उत्तर : डेन्मार्क युरोप
प्रश्न : भारतामध्ये सर्वात जास्त बालविवाह कोणत्या राज्यात होतात ?
उत्तर : झारखंड
प्रश्न : सर्वात आधी मंगळावर पोहचलेला देश कोणता ?
उत्तर : सोव्हिएत युनिअन (1971)
प्रश्न : असा कोणता प्राणी आहे जो वर आकाशाकडे बघू शकत नाही ?
उत्तर : डुक्कर
प्रश्न : भारतीय चलनाचं चिन्ह (₹) कोणी डिझाईन केलं होतं ?
उत्तर : उदय कुमार धर्मलिंगम (2010)
प्रश्न : भारताचे संविधान बनवण्यासाठी किती वेळ लागला होता ?
उत्तर : 2 वर्षे 11 महिने 17 दिवस
प्रश्न : मानवी शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते ?
उत्तर : 60 टक्के
प्रश्न : आपण एका मिनिटामध्ये किती वेळा श्वास घेतो ?
उत्तर : 12-20 वेळा
प्रश्न : झिरो (0) या अंकाचा शोध कोणत्या देशामध्ये लागला होता ?
उत्तर : भारत
प्रश्न : भारतामध्ये असं कोणतं शहर आहे जे पाण्यात बुडालेलं आहे ?
उत्तर : द्वारका (गुजरात)
प्रश्न : मुकेश अंबानींचा जन्म कोणत्या देशात झाला होता ?
उत्तर : यमन, 19 एप्रिल 1957
प्रश्न : भारतातील कोणत्या शहरांमध्ये सर्वात जास्त पगार दिला जातो ?
उत्तर : बँगलोर ( बँगलोर या शहरामध्ये प्रति व्यक्ती आय ही सरासरी 40,000 एवढी आहे)
प्रश्न : एक मनुष्य आपल्या आयुष्यातील सरासरी किती वर्षे हे झोपण्यामध्ये व्यतीत करतो ?
उत्तर : 18 ते 25 वर्षे
प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे, जी महिन्यातून एकदा येते अन् 24 तासानंतर निघून जाते ?
उत्तर : तारीख