शेतीशिवार टीम, 11 जानेवारी 2022 : डायबिटीज पेशेंटचा आहार त्यांच्या रक्तातील साखरेवर अवलंबून असतो. अशा लोकांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली नाही तर रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त होते. मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी, विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये. अशा परिस्थितीत औषधांव्यतिरिक्त अशा काही गोष्टींचा आहारात समावेश करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या पदार्थांचा अवलंब केल्यास रक्तातील साखरेची पातळी सहज नियंत्रित ठेवता येते. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा आहारात समावेश करायला हवा.

1) टोमॅटोचा जूस :-

मधुमेहाच्या रुग्णाने आपल्या आहारात टोमॅटोच्या जूसचा समावेश करावा. हा रस पिण्यासाठी चवदार तर असतोच पण रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. टोमॅटोमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, तसेच त्यात आढळणारे प्युरीन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

2) बीटरूट :-

मधुमेहाच्या रुग्णांसाठी बीटरूट खूपच फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, पोटॅशियम, आयर्न , मॅंगनीज यांसारखी मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात बीटरूटचा समावेश करावा कारण त्याच्या सेवनाने शरीरातील रक्त शुद्ध होते. मधुमेहाचे रुग्ण बीटरूटचे सेवन सॅलड, ज्यूस किंवा कोणत्याही स्वरूपात करू शकतात.

3) रताळे :-

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रताळे खाणे खूप फायदेशीर मानले जाते. या मध्ये कमी प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स आहे, म्हणून ते सेवन केले जाऊ शकते. याशिवाय रताळे हा देखील फायबरचा चांगला स्रोत आहे. याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

4) कारल्याचा जूस :-

कारल्याचा रस सेवन करण्यासही खूपच कडू असतो. पण ते पिण्याचे अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन०बी, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, रिबोफ्लेविन आणि थायामिन यांसारखे पोषण त्यात आढळते. कारल्याचा रस नियमित प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

5) काकडीचा जूस :- 

काकडी साधारणपणे सर्वांनाच आवडते. पण मधुमेहाच्या रुग्णाने काकडीचा जूस जरूर प्यावा. काकडीमध्ये भरपूर फायबर आणि पोटॅशियम असते. त्यामुळे त्याचा आहारात समावेश करावा. याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *