नव्या तंत्रज्ञानाचे तसेच आर्थिक गरजेनुसार वीज वापराच्या नियोजनाचा अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड वीजमीटर लघुदाब घरगुती वाणिज्यिक औद्योगिक व इतर ग्राहकांकडे मोफत बसविण्याचे नियोजन महावितरणकडून पूर्णत्वास गेले आहे. यामध्य पश्चिम महाराष्ट्रात सिंगल व थ्री फेजच्या एकूण 68 लाख 39 हजार 752 वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत.
यासोबतच महावितरणच्या वितरण यंत्रणेतील विजेचा हिशेब आणखी अचूक ठेवण्यासाठी 1 लाख 28 हजार 623 वितरण रोहित्रे, वीज वाहिन्यांना स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत.
विजेच्या व नवीन वीज जोडण्याचा मागणी वाढत आहे. दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी तसेच वितरण यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना राबविण्यात येणार आहे या योजनेतून लघुदाब वीज ग्राहकांकडे प्रीपेड स्मार्ट मीटर देखील लावण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे व विजेच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रीपेड मीटर बसविण्यात येत आहे.
ग्राहकांना अधिकार देणारे स्मार्ट येत्या मार्चपासून हे मीटर टप्प्याटप्प्याने पश्चिम महाराष्ट्रात बसविण्याचे काम सुरु होईल. सध्या अस्तित्वात असलेल्या पारंपरिक वीज मीटरच्या प्रणालीमध्ये 68 लाख 40 हजार ग्राहकांकडे जाऊन दरमहा मीटरचे फोटो, रीडिंग घेणे, त्यानुसार वीजबिल तयार करणे व बिलांचे वितरण करणे या प्रक्रियेत काही दिवसांचा कालावधी लागतो.
तसेच घराला कुलूप असल्याने रीडिंग न घेता येणे, चुकीचे असल्यास दुरुस्ती करणे, मीटर नादुरुस्त होणे तसेच वीज बिलांचा भरणा न होणे, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे अशी कारणे उद्भवतात. त्यामुळे स्मार्ट मीटरिंगची प्रक्रिया सुरु केली आहे.
वीजग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटर उपयुक्त असून त्यामुळे विजेवरील खर्च नियंत्रणात राहील. पाहिजे तेवढाच वीजवापर करता येईल. बिलिंगच्या तक्रारीही संपुष्टात येतील. विशेष म्हणजे स्मार्ट मीटरमधील रिचार्जची रक्कम सायंकाळी 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत संपली तरी वीजपुरवठा सुरु राहील. मात्र संबंधित ग्राहकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत रक्कम भरुन वीजपुरवठा सुरु ठेवणे आवश्यक आहे. भरलेल्या रकमेतून रिचार्ज संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील, अशी सुविधा आहे.
Smart Meter ने नेमकं काय – काय बदलणार ?