नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीलिंगच्या भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट शासनाकडून आलं आहे. महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 अंतर्गत शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. भूमिहीन लाभार्थ्यांना या शेतजमिनीचे तुकडे देण्यात आले आहे.

अशाच जमिनी वर्ग 2 मध्ये आहेत. त्या जमिनीचा भोगवटादार वर्ग 2 मध्ये समावेश आहे. अशा वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी या शेतकऱ्यांना मुभा देण्यात आलेली नव्हती. अशा जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित केल्या जात नव्हत्या..

यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक राजपत्र निर्गमित करण्यात आले होते, तसेच मंत्रिमंडळाची मंजुरी देखील मिळालेली होती. परंतु अध्याप देखील या संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या नव्हत्या.

परंतु आता 8 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या सिलिंगच्या भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी एक परिपत्रक काढून मंजुरी देण्यात आली आहे. या जमिनी कशाप्रकारे भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग – 1 मध्ये रुपांतरीत कराव्यात या संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे.

पहा, परिपत्रकातील मार्गदर्शक सूचना..

महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 (सुधारणा) अधिनियम, 2023 अन्वये उक्त अधिनियमामध्ये कलम 28-1 (अअ) मधील पोट कलम (3) खाली नवीन पोटकलम (3-1अ) अन्वये माजी खंडकरी शेतकरी अथवा त्यांचे कायदेशीर वारसांना वाटप करण्यात आलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग -2 वरुन भोगवटादार वर्ग -1 करण्यासंदर्भातशासन परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

1 ) “ज्या व्यक्तीनी (खंडकरी शेतकऱ्यांनी) औद्योगिक उपक्रमांना त्यांच्या पट्टयाने (खंडाने) दिलेल्या जमिनी वर्ग – 1 भोगवट्याच्या होत्या अशा व्यक्तीस किंवा तिच्या कायदेशीर वारसांना वर्ग -2 भोगवट्यावर दिलेल्या जमिनी महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा) अधिनियम, 2023 महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रथम प्रसिध्द केलेल्या दिनांकापासुन त्यासाठी कोणतेही अधिमूल्य न आकारता, वर्ग-1 भोगवट्यावर देण्यात आले असल्याचे मानण्यात येतील.

त्यानुसार संबधित तहसिलदार यांनी त्यांच्या स्तरावरुन गावनिहाय आढावा घेवुन या शासन परिपत्रकाच्या दिनांकापासुन एक महिन्याच्या कालावधीत गावनिहाय एकच आदेश करुन गावदप्तरी अंमल घ्यावा. ( फेरफार, अधिकार अभिलेख इत्यादी बाबत)

२ ) ज्या व्यक्तीनीं (खंडकरी शेतकऱ्यांनी) औद्योगिक उपक्रमांना त्यांच्या पट्टयाने (खंडाने) दिलेल्या जमिनी वर्ग -2 भोगवट्याच्या होत्या अशा व्यक्तीस किंवा तिच्या कायदेशीर वारसांना वर्ग 2 भोगवट्यावर दिलेल्या जमिनी धारणाधिकार भोगवटादार वर्ग -1 मध्ये रूपांतर करता येईल.

तथापि, त्यासाठी जर अशा जमिनींना लागू असलेल्या संबंधित कायद्यात किंवा त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांमध्ये संबधित अधिनियम व नियमांच्या तरतुदींनुसार, अशा रूपांतरणाबाबत जी कायदेशीर तरतूद असेल त्यानुसार कार्यवाही करणे व त्या कायद्यात निश्चित केलेल्या सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेवुन कार्यवाही करणे आवश्यक राहील.

3 ) ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांनी वाटप केलेली जमीन परवानगी घेऊन विहीत अधिमुल्य रक्कम भरुन हस्तांतरित केली असेल अशा प्रकरणी प्रस्तुत जमीन भोगवटादार वर्ग -2 वरुन भोगवटादार वर्ग -1 रुपांतरित करण्याबाबत ज्या खंडकरी शेतकऱ्यांची जमीन खंडाने देतेवेळी भोगवटादार वर्ग -1 होती त्याबाबत संबधित तहसिलदार उपरोक्त नमुद (1) प्रमाणे कार्यवाही करतील व ज्या खंडकरी शेतकऱ्यांची जमीन खंडाने देतेवेळी भोगवटादार वर्ग -2 होती त्याबाबत उपरोक्त नमुद (2) प्रमाणे कार्यवाही करावी.

4 ) ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांनी वाटप केलेली जमीन विनापरवानगी हस्तांतरित केली असेल किंवा विहीत अधिमुल्य रक्कम भरलेली नसेल अशा प्रकरणी झालेला शर्तभंग नियमानुकुल करताना उक्त अधिनियमातील कलम 29 मध्ये नमुद केलेली अधिमुल्य रक्कम भरल्यानंतर व जिल्हाधिकारी यांच्या पुर्वमान्यतेने भोगवटादार वर्ग -2 वरुन भोगवटादार वर्ग 1 रुपांतरित करण्याची कार्यवाही उपरोक्त क्र.1 ) व 2) मधील तरतूदी विचारात घेवुन करण्यात यावी.

क ) उक्त अधिनियमातील कलम 28-1 (अअ ) मधील पोटकलम 3 अ मध्ये महाराष्ट्र महसूल संहिता, 1966 च्या कलम 2 च्या खंड (10) मध्ये परिभाषित केलेल्या गावठाण किंवा गावाच्या जागेच्या हद्दीपासुन 5 किलोमीटर अंतरातील शेती महामंडळाची जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे.

सदर तरतुदीन्वये ग्रामपंचायतीकडून केवळ गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन किंवा पाणीपुरवठा योजना या सार्वजनिक प्रयोजनार्थच जमीन मागणी अनुज्ञेय राहील..

संपूर्ण शासन निर्णय पाण्यासाठी :- इथे क्लिक करा

 

अर्जाचा नमुना संच :- इथे क्लिक करा  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *