Solar Rooftop Yojana : एकदाच ₹ 28,000 गुंतवा अन् 25 वर्षापर्यंत महागड्या वीज-बिलापासून सुटका मिळवा ; पहा प्रोसेस !
विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाने घराच्या छतावरील सौर वीज प्रकल्पाला 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिलं आहे. योजनेला चालना देण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली असून, कमीत कमी कालावधीत सौर यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महावितरणने प्रत्येक मंडल, विभाग व उपविभाग पातळीवर एका नोडल अभियंत्यांची नेमणूक सुद्धा केली आहे.
हा अभियंता महावितरण एजन्सी व ग्राहक यांच्यात समन्वय साधून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करणार आहे. लवकरच विभागनिहाय ग्राहक मेळावे सुद्धा आयोजित केले जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे छतावरील सौर प्रकल्प योजनेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू आहे. योजनेंतर्गत घरगुती ग्राहकांना 1 ते 3 किलावॅट क्षमतेसाठी 40 टक्के तर 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या प्रकल्पाला 20% अनुदान दिलं जाणार आहे. घरगुतीमध्ये गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संस्थांनाही समाविष्ट केले आहे.
अनुदानासाठी शासनाने अंदाजे क्कम निश्चित केली असून, प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी किंवा जास्त खर्च येऊ शकतो. यामध्ये इमारतीची उंची, बसविले जाणारे मीटर व अथिंगसाठी लागणारी केबल इत्यादी खचांमुळे बदल संभवतो. अर्ज करताना लघुदाब ग्राहकांसाठी 500 तर उच्चदाब घरगुती ग्राहकांसाठी 5000 इतके प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे.
अर्ज कोठे करावा :-
छतावरील सौर प्रणालीकरिता अर्ज करण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी कंपनीच्या संकेतस्थळाला किंवा https://www.mahadiscom.in ismart / या लिंकवर भेट द्यावी. अर्ज करताना वीजग्राहक क्रमांक = इ – मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करुन पुढील माहिती भरावी. ज्या ग्राहकांचा मंजूर वीजभार 3 किलोवॅटपेक्षा कमी आहे. त्यांना भार वाढवून घेण्याची आवश्यकता नाही…
पाच वषाचा करार :-
सौरऊर्जा प्रकल्पाची देखभालीची हमी 5 वर्षांची राहील. तसा करार संबंधित एजन्सी व ग्राहक यांच्यात होईल. कराराचा मजकूर ऑनलाईन उपलब्ध आहे. सर्व कागदपत्रे डाऊनलोड करुन, व्यवस्थित भरुन अपलोड करणे गरजेचे आहे. प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महावितरणचे नोडल अभियंता व एजन्सी मदत करतील.
किती येतो खर्च :-
1 किलोवॅटकरिता येणारा खर्च पाहता शासनाने निश्चित केलेल्या 46.820 रुपये किमतीच्या 40 टक्के म्हणजेच 18,720 इतके अनुदान प्राप्त होईल, अनुदान वगळता ग्राहकाला प्रक्रिया शुल्काव्यतिरिक्त अंदाजे 28,092 रुपये खर्च येऊ शकतो.
2 किलोवॅटकरिता येणारा खर्च पाहता शासनाने निश्चित केलेल्या 84940 रुपये किमतीच्या 40% म्हणजेच 33976 इतके अनुदान प्राप्त होईल, अनुदान वगळता ग्राहकाला प्रक्रिया शुल्काव्यतिरिक्त अंदाजे 33976 रुपये खर्च येऊ शकतो.
3 किलोवॅटकरिता येणारा खर्च पाहता शासनाने निश्चित केलेल्या 1,24,140 रुपये किमतीच्या 40% म्हणजेच 49656 इतके अनुदान प्राप्त होईल, अनुदान वगळता ग्राहकाला प्रक्रिया शुल्काव्यतिरिक्त अंदाजे 74440 रुपये खर्च येऊ शकतो.
प्रकल्पाची क्षमता जेवढी अधिक तेवढा प्रतिकिलो वॅटमागे येणारा खर्च कमी होतो. एखाद्या गृहनिर्माण संस्थेने त्यांच्या छतावर 10 किलोवेंटपेक्षा जास्त क्षमतेची सौरप्रणाली बसविली तर त्याचा प्रतिकिलो वॅटचा खर्च साधारणपणे 37,020 रुपये इतकाच येतो.
Solar Rooftop Yojana : तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अर्ज कसा कराल ?
सोलर रूफटॉप योजनेसाठी उमेदवार त्यांच्या छतावर सोलर पॅनेल मोफत बसवण्यासाठी अधिकृत वेबसाइट solarrooftop.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या प्रक्रियेद्वारे जाणून घ्या –
solarrooftop.gov.in वर या अधिकृत व्हेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ‘Solar Rooftop Calculator’ हे कॅल्क्युलेटर देण्यात आलं आहे. यामध्ये तुम्हाला ‘Solar Panel Capacity you want to install’ यावर क्लिक करून तुमच्या किती किलोवॅट सोलर पॅनल लागणार आहे तसेच ‘Your budget’ इत्यादी माहिती भरून तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता…
या नंतर तुम्ही होम पेजवर Apply For Rooftop Solar पर्यायावर क्लिक करा.
पुढील पृष्ठावर आपल्या राज्याच्या वेबसाइटच्या css.mahadiscom.in लिंकवर क्लिक करा.
अर्ज तुमच्या समोर उघडेल.
फॉर्ममध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
सौर रूफटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
टीप : तुम्ही हा फॉर्म जनसेवा केंद्रावरही भरू शकता.
सोलर रूफटॉप योजनेचा (Solar Rooftop Yojana) हेल्पलाइन क्रमांक :-
सोलर रूफटॉप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी किंवा या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही या हेल्पलाइन क्रमांक 1800 180 3333 वर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपर्क माहिती देखील मिळवू शकता आणि तुमची समस्या सहजपणे सोडवू शकतात.
अर्ज भरण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्र (सेतू) केंद्राला भेट द्या.
माऊली डिजिटल सेवा सेतू केंद्र :-
तलाठी कार्यालयाजवळ, दुर्गा देवी चौक, नेवासा, मो. 9970434665
[…] Solar Rooftop Yojana : एकदाच ₹ 28,000 गुंतवा अन् 25 वर्षाप… […]