राज्य मंडळाच्या वतीने 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली. यंदा राज्यातील 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची तर, इयत्ता दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
आता दहावी- बारावीच्या परीक्षेचा निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. माध्यमिक शिक्षण मंडळातील उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या निकालाच्या अगोदर बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. तर बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल जाहीर होईल.
26 ते 30 मे दरम्यान बारावीचा निकाल लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे.
दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान घेण्यात आली. दहावी आणि बारावीची उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून, तपासणी नंतरची कामेही अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे 26 मे पर्यंत बारावी आणि 30 मे अथवा जूनच्या पहिल्या आठवडयात दहावीचा निकाल जाहिर होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून राज्य मंडळाच्या दहावी – बारावीच्या परीक्षांच्या तारखांबाबत सातत्याने अफवा सुरु आहे. पण, अद्याप राज्य शिक्षण मंडळाने अद्याप निकालाच्या तारखा निश्चित केलेल्या नाहीत असेही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले..
महाराष्ट्र बोर्ड SSC (10वी) HSC (12वी) निकाल 2024 कसा तपासायचा ?
महाराष्ट्र 10वी, 12वीचा निकाल 2024 तपासण्यासाठी सोप्या टिप्स :-
mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मुख्यपृष्ठावर, महाराष्ट्र 10वी, 12वी निकाल 2024 लिंकवर क्लिक करा.
रोल नंबर आणि आईचे नाव यांसारखी क्रेडेन्शियल्स एंटर करा. महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2024 किंवा महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2024 वर क्लिक करा.
‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
महाराष्ट्र 10वी, 12वी चा निकाल 2024 स्क्रीनवर दिसेल.