केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ ही योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या प्रकल्पास खर्चाच्या 35 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेचे निकष बदलण्यात आले असल्याने अन्नप्रक्रियेसंदर्भातील इतर उद्योगांनाही आता अनुदान मिळणार आहे.

बारामती उपविभागात आतापर्यंत बारामती तालुक्यात 44, दौंड तालुक्यात 53 , इंदापूर तालुक्यात 42 व पुरंदर तालुक्यात 21 असे एकूण 160 प्रकल्पांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये 16 प्रकल्पांचे बँक कर्ज मंजूर झालेले असून 38 प्रकल्पांचे बँक कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहे.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी व उद्योजकांना वैयक्तिक लाभासाठी 35% अनुदानासह 10 ते 25 लाखांचं कर्ज मिळतं. तसेच या योजे अंतर्गत जो काही टेक्निकल सपोर्ट हवाय तो ही मिळणार आहे.

या योजनेत शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सहभाग घेता येतो. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी, उत्पादक गट कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था यांच्या नवीन उद्योगांना प्राधान्य दिले जाते. उत्पादनाबाबत पुरेसे ज्ञान व किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. एखादा शेतकरी किंवा शेतकरी गट एकत्र येऊन शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारू शकतात . ही योजना राबविण्यासाठी उद्योगामध्ये 10 पेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत..

अर्जदाराचा उद्योगावर मालकी हक्क असावा. अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण असावे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असे . प्रकल्पाच्या किंमत व खेळत्या भांडवलासाठी किमान 10 ते 40% लाभार्थी हिस्सा व उर्वरित बँक मुदतकर्ज घेण्याची तयारी असावी. सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतमालाचे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होईल.

त्यामुळे शेतकरी, उत्पादक गट कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था यांनी योजनेत सहभाग नोंदवून लाभ घ्यावा, अर्ज करण्यासाठी व अन्य माहितीसाठी गावचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक मंडळ शेतमालाचे कृषी अधिकारी व तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

पहा पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा… 

https://shetishivar.com/government-scheme/pmfme-scheme-2022-online-process/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *