राज्यातील तलाठी पदभरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून, सर्व 36 जिल्ह्यांसाठी तब्बल 4हजार 644 तलाठी भरतीची जाहिरात महसूल विभागाने काढली आहे. या भरतीसाठी सोमवार, 26 जूनपासून 17 जुलै 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल. परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार असून, राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांच्या केंद्रांवर ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.लक्षात ठेवा मित्रांनो, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदभरती रखडली होती. सरकारने तलाठी भरतीची घोषणा केली, मात्र त्याला मुहूर्त मिळत नव्हता. राज्यभरात सर्वत्र तलाठ्यांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील महसूल आणि शेतकऱ्यांशी संबंधित कामांचा खोळंबा होता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
दुसरीकडे, भरता रखडल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यांच्याकडून तलाठी भरतीसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू होता. अखेर महसूल विभागाने शुक्रवारी जाहिरात प्रसिद्ध केली. ऑनलाइन परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1 हजार, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
किमान पदवीधर अशी शैक्षणिक अहर्ता असून, खुल्या वर्गासाठी 38 वर्षे ही वयोमर्यादा आहे.2 तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा 200 गुणांचा पेपर असणार आहे.
या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. उमेदवारांना जिल्हा निवडीचा य दिला असून, परीक्षार्थीची निवड यादी प्रत्येक जिल्ह्यानुसार लागणार आहे.
आदिवासी भागात पेसा (अधिसूचित क्षेत्र) कायद्यानुसार स्थानिक आदिवासी उमेदवारांना संधी मिळणार आहे. या भरतीसाठी 17जुलै पर्यंत मुदत असणार आहे तसेच 4644 पदांसाठी जागा आहेत.
पदाचे नाव –तलाठी
पद संख्या – 4644जागा
शैक्षणिक पात्रता –पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. 1000/- – राखीव वर्ग : 900/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2023
परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे.
जिल्हा | पद संख्या | जिल्हा | पद संख्या |
अहमदनगर | 250 Posts | नागपूर | 177 Posts |
अकोला | 41 Posts | नांदेड | 119 Posts |
अमरावती | 56 Posts | नंदुरबार | 54 Posts |
औरंगाबाद | 161 Posts | नाशिक | 268 Posts |
बीड | 187 Posts | उस्मानाबाद | 110 Posts |
भंडारा | 67 Posts | परभणी | 105 Posts |
बुलढाणा | 49 Posts | पुणे | 383 Posts |
चंद्रपूर | 167 Posts | रायगड | 241 Posts |
धुळे | 205 Posts | रत्नागिरी | 185 Posts |
गडचिरोली | 158 Posts | सांगली | 98 Posts |
गोंदिया | 60 Posts | सातारा | 153 Posts |
हिंगोली | 76 Posts | सिंधुदुर्ग | 143 Posts |
जालना | 118 Posts | सोलापूर | 197 Posts |
जळगाव | 208 Posts | ठाणे | 65 Posts |
कोल्हापूर | 56 Posts | वर्धा | 78 Posts |
लातूर | 63 Posts | वाशिम | 19 Posts |
मुंबई उपनगर | 43 Posts | यवतमाळ | 123 Posts |
मुंबई शहर | 19 Posts | पालघर | 142 Posts |