Cabinet Decision: ‘या’ विद्यार्थ्यांना दरमहा मिळणार 2,500 रु. अर्थसहाय्य; 54 हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ, पहा कागदपत्रे अन् अर्ज प्रोसेस..
महाराष्ट्रातील बालसंगोपन योजनेच्या लाभार्थीच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली असून, यापुढे दरमहा 2,500 रुपये अनुदान मिळणार आहे. आधी अकराशे रुपये मिळत होते. राज्याचे महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात गुरुवारी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना महत्त्वपूर्ण घोषणा करीत कोरोना एकल महिलांसह राज्यातील 54 हजारांवहून अनाथ व एकल बालकांना मोठा दिलासा दिला आहे.
यापुढे आता कोरोना एकल महिलांना रोजगारासाठी पंडिता रमाबाई व्याजमाफी योजनेंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून दोन वर्षांसाठी एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. या महिलांना कर्ज वसुलीसाठी होणाऱ्या त्रासाबाबत लवकरच उपयोजना करण्यात येणार आहेत.
त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बालसंगोपन योजनेचे अनुदान 1,100 वरून 2,500 रुपये करण्याची व एकल महिलांसाठी पंडिता रमाबाई योजना व्याजमाफी योजनेची घोषणा केली होती. परंतु सरकार बदलल्याने ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही..
परंतु गुरुवारी हिवाळी अधिवेशनात बालसंगोपन योजना अनुदान वाढ व पंडिता रमाबाई योजना याविषयीचा शासन निर्णय काढण्याची घोषणा बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.
कसा घ्याल बाल संगोपन योजना चा फायदा..
ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील व ज्या मुलांना आई व वडील दोन्ही ही नसतील अशा बालकांना या योजनेचा लाभ मिळतो.
0 ते 18 वयोगटातील बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो. एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना ही लाभ दिला जातो.
किती रक्कम मिळते ?
एका मुलांसाठी आतापर्यंत 1100 रुपये प्रतिमहिना मिळत होता तो आता वाढवून 2,500 रुपये केला आहे. त्यामुळे एका वर्षाला 30,000 /- रु. मिळतील.)
वय 18 पुर्ण होईपर्यंत दर महिन्याला रक्कम मिळते.
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत … ?
1 ) योजने साठी करावयाचा अर्ज व अर्जासोबत..
2 ) आधार कार्ड च्या झेरॉक्स पालकांचे व बालकांचे
3 ) शाळेचे बोनाफाईड सर्टफिकेट
4 ) तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला
5 ) पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र (मृत्युचा दाखला)
6 ) पालकाचा रहिवासी दाखला .
7) मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स
10 ) मुलांचे पासपोर्ट फोटो 2
11 ) पालकाचे पासपोर्ट फोटो सदर सर्व कागद पत्रांची पूर्तता करून अर्ज करता येतो .
8 ) मृत्यूचा अहवाल
( 9 ) रेशन कार्ड झेरॉक्स ,
10 ) घरा समोर पालका सोबत बालकांचा फोटो 4 बाय 6 फोटो पोस्ट कार्ड, मापाचा फोटो (प्रत्येक मुलासोबत पालकाचा सेपरेट फोटो)
ही योजना कोण मंजूर करते ?
हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्ह्याच्या / तालुक्याच्या ठिकाणी असणारी बाल कल्याण समितीकडे सादर केला जातो. व ती समिती अर्ज मंजुर करते
जिल्हा परिषद शाळेत व महाविदयालय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला बोनाफाईट आत्ताच शाळेतून काढून ठेवावा व या योजनेचा लाभ घ्याव
18 वर्षापर्यंत बालकांच्या शिक्षणाच्या खर्चा साठी चिंता मुक्त व्हाल…
टीप :- सदर योजना अनेक वर्षा पासून चालु आहे . परंतु अनेक पालकांना ही योजनेबद्दल पुरेशी माहिती नसते त्यामुळे ते अनुदानापासून वंचित राहतात. तर मित्रांनो जवळ आसपास अनाथ मुले किंवा आई आहे पण वडील नाही अन् तो विद्यार्थी या योजनेपासून वंचित आहे त्याच्यापर्यंत ही माहिती अवश्य पोहचवा..