केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नाशिककरांसाठी महत्वाच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या 122 कि.मी लांबीच्या सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे. नाशिकमधील इतर प्रकल्पांच्या लोकार्पण आणि कोनशिला अनावरणाच्या समारंभावेळी मंत्री नितीन गडकरींनी ही महत्वपूर्ण माहिती दिली.
नाशिकमधून जाणाऱ्या सुरत – चेन्नई हायवेमुळे मोठी क्रांती होणार आहे. या प्रकल्पाची 80 हजार कोटी रुपये किंमत असून यापैकी 10 हजार कोटी रुपयांचे काम एकट्या नाशिक जिल्ह्यात होणार आहे. या महामार्गाच्या पूर्ततेनंतर सुरतवरून फक्त 10 तासांमध्ये चेन्नईला पोहोचता येणार आहे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
समृद्धी महामार्गानंतर नाशिकच्या वाहतुकीला चालना देण्यासाठी भारतमाला प्रकल्पांतर्गत ‘ग्रीनफिल्ड हायवे’ या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातून जाणारा सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग लवकरच साकार होणार आहे. या महामार्गासाठी लागणाऱ्या जागेच्या मोजणीसाठी डिसेंबर महिन्यात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या महामार्गासाठी जिल्ह्यातील 609 गावांतील तब्बल 996 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. नाशिक ते सुरत अंतर केवळ 176 किमी आहे, त्यामुळे नाशिककरांना अवघ्या 2 तासात सुरत शहर गाठता येणार आहे. 2022 पर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच 2024 मध्ये हा महामार्ग खुला करण्याची सरकारची योजना आहे.
सुरत-चेन्नई या महामार्गामुळे 1,600 किमीचे हे अंतर तब्बल 1,250 किमी इतके कमी होणार आहे. या प्रस्तावित महामार्गामुळे सुरत, अहमदनगर, सोलापूर, हैदराबाद, चेन्नई ही औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. हैदराबादस्थित आर्वी असोसिएट्स आर्किटेक्चरल डिझायनर कन्सल्टंट प्रा. लि. या कंपनीला मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे काम देण्यात आलं आहे.
सुरत चेन्नई महामार्गाचे राज्यातलं अंतर किती ?
या महामार्गाची महाराष्ट्रातील लांबी 422 किलोमीटर असून 122 किलोमीटर मार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. या महामार्गासाठी महाराष्ट्रात 4,200 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. यानिमित्ताने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भूसंपादनातून भरपूर पैसे मिळणार आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल. पुणे आणि मुंबई येथील ट्रॅफिक कमी होईल. उत्तर भारतातील लोक थेट नाशिकमधून दक्षिणेत जाऊ शकणार आहे.
या प्रकल्पासाठी अहमदनगर जिल्ह्यांत भूसंपादन पूर होण्याच्या मार्गवर आहे. त्यानंतर पुढील तीन वर्षांत महामार्ग तयार होईल. या महामार्गासाठी नाशिकमध्ये 122 किलोमीटर परिसरात 997 हेक्टर भूमी अधिग्रहित केली जाणार आहे. हा महामार्ग सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड आणि सिन्नर या तालुक्यांतल्या 69 गावांतून जाणार आहे.
अहमदनगर – बीड – धाराशिव – सोलापूरातील ‘या’ गावांतून जाणार ‘हा’ महामार्ग ; पहा, गट नंबर अन् शेतकऱ्यांची नावे
यामध्ये दिंडोरीतील सर्वाधिक 23 गावांचा समावेश आहे. सिन्नर येथील वावीमध्ये हा मार्ग समृद्धी एक्स्प्रेसला जोडला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या नाशिक, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातुन हा महामार्ग जाणार आहे. हा मार्ग राज्यात राक्षसभुवन (ता. सुरगाणा) येथे प्रवेश करेल तर या मार्गात राज्यातील शेवटचे गाव अक्कलकोट (ता. सोलापूर) असणार आहे. या महामार्गामुळे नाशिक ते सोलापूर हे अंतर 50 किलोमीटरने कमी होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमधून जाणार आहे हा मार्ग
सुरगाणा – बेंडवाज, बहुदा, दुधवळ, गहाळे, रक्षाभुवन, हाते, जाहुले, कहांडोळसा, कोटंबा, मर्दंड, पिंपळचोंद, सांबरखाल.
दिंडोरी – तेतमाळा, रडतोंडी, कवडसर, चिल्हारपाडा, महाजे, चाचडगाव, उमराळे बुद्रुक, जांबुटके, नालेगाव, इंदोरी, रशेगाव, ननाशी,
पिंपळनेर, रामशेज, आंबेदिंडोरी, ढाकंबे, शिवनई, वरवंडी, गांडोळे, आंबोळेगाव, बाडलेगाव, बाडपेठ.
अहमदनगर-बीड-धाराशिव-सोलापूरातील शेतकऱ्यांची नावे अन् गट नंबर जाहीर, पहा PDF अन् रोडमॅप..
पेठ – पाहुचीबारी, विरमळ, कळंबरी, वडबारी, हरणगाव.
नाशिक – आडगाव, ओढा, विंचुरगवली, लाखलगाव.
निफाड – चेहेडी खुर्द, चाटोरी, वऱ्हे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावली, तळवडे, पिंपळगाव निपाणी.
सिन्नर – देशवंडी, पाटपिंप्री, निमगाव देवपूर, बारागाव पिंपरी, गुळवंच, देवपूर, खोपडी बुद्रुक, धरणगाव, फर्दापूर, पांगरी बुद्रुक, भोकणी, पांगरी खुर्द, फुलेगणर, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी.
Surat-Chennai : अहमदनगरमधील ‘या’ 47 गावांतील शेतकरी होणार मालामाल; ‘या’ महिन्यापर्यंत 800 कोटी होणार खात्यावर जमा..
मुंबई ते नाशिक सिक्स लेन सिमेंट काँक्रिटीकरणही होणार..
महाराष्ट्रात मंत्री असताना मुंबई – नाशिक हायवे बांधण्याचा निर्णय घेतला गेला होता. मुंबई ते नाशिक संपूर्ण रस्त्याचे सिक्स लेन काँक्रिटीकरण होईल तर वडपे हे महत्त्वाचे जंक्शन असणार आहे. लवकरच मुंबई ते दिल्ली हा एक लाख कोटी रुपयांचा हायवे बांधून पूर्ण होईल. त्यामुळे 7 ते 8 तासांत दिल्लीला जाणे शक्य होणार आहे, या रस्त्यामुळे विकासाला गती मिळणार आहे.