केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासंदर्भात (DA) एक मोठी बातमी समोर आली आहे. म्हणूनच सर्व कर्मचाऱ्यांनी या लेखाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आता पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये महागाई भत्ता वाढणार आहे. परंतु, त्याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण, नवीन वर्षात महागाई भत्त्याचे कॅल्क्युलेशन नव्या सूत्राने होणार आहे. याशिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळालेल्या DA वाढीवरही कर भरावा लागणार आहे. वास्तविक पाहता , कामगार आणि रोजगार मंत्रालयाने महागाई भत्त्याच्या कॅल्क्युलेशनचे सूत्र बदललेलं आहे.

DA वाढीच्या आधारभूत (Base Year) वर्षात झाला बदल..

कामगार मंत्रालयाने 2016 मध्ये DA वाढीचे मूळ वर्ष बदललं होतं. मजुरी दर निर्देशांक (WRI-Wage Rate Index) ची नवी सिरीज प्रसिद्ध झाली आहे. कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मूळ वर्ष 2016 = 100 असलेली नवीन सिरीज जुन्या सिरीजच्या 1963 – 65 च्या मूळ वर्षाच्या जागी येईल.

कसं होणार DA Hike चे कॅल्क्युलेशन :-

7 व्या वेतन आयोगाअंतर्गत, महागाई भत्त्याची रक्कम (DA Hike) चे कॅल्क्युलेशन सध्याच्या महागाई भत्त्याच्या दराला मूळ वेतनाशी गुणाकार करून केली जाते. टक्केवारीचा सध्याचा दर 12% आहे, अन् तूमचे मूळ वेतन रु. 18,000 DA (18000 x12) /100 आहे. महागाई भत्ता टक्केवारी = गेल्या 12 महिन्यांची CPI ची सरासरी – 115.76. आता जो आकडा येईल त्याला 115.76 ने भागले जाईल अन् नंतर येणार्‍या संख्येचा 100 ने गुणाकार केला जाईल.

DA वाढीवर भरावा लागणार TAX ?

महागाई भत्ता पूर्णपणे करपात्र (Taxable) आहे. भारतातील आयकर नियमांनुसार, आयकर रिटर्न्समध्ये (income tax return) महागाई भत्त्याची स्वतंत्र माहिती प्राप्तिकर विवरणपत्रात द्यावी लागते. तुम्हाला महागाई भत्त्याच्या (DA) नावावर मिळणाऱ्या रकमेवर कर भरावा लागणार आहे.

तुम्हाला किती मिळेल फायदा ?

7व्या वेतन आयोगाअंतर्गत सॅलरी कॅल्क्युलेशनसाठी, कर्मचाऱ्याच्या मूळ पगारावर DA मोजला जातो. समजा एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा किमान मूळ वेतन 26,000 रुपये असेल, तर त्याचा DA 26,000 च्या 38% असेल, म्हणजे एकूण 9,880 रुपये मिळते. पुढील डीए वाढीवर दरमहा पगारात 910 रुपयांची वाढ होऊ शकते. जर DA 4% दराने वाढला आणि तो 42% पर्यंत पोहोचला. हे एक उदाहरण आहे. त्याचप्रमाणे, इतर केंद्रीय कर्मचार्‍यांचे वेतन देखील 7 व्या CPC पे मॅट्रिक्समध्ये भिन्न असणार आहे. तुमचा मूळ पगार पाहून त्याचे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता..

महागाई भत्ता (DA) म्हणजे काय ?

सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहण्या – खाण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. महागाई वाढल्यानंतरही कर्मचार्‍यांच्या राहणीमानात काही फरक पडत नाही, म्हणून ही सुरुवात करण्यात आली. हा पैसा सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातो. भारतात 1972 मध्ये पहिल्यांदा मुंबईतून महागाई भत्ता (DA) सुरू करण्यात आला. यानंतर केंद्र सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यास सुरुवात केली.

महागाई भत्त्याचे प्रकार किती आहेत ?

महागाई भत्ता (DA Hike) दोन प्रकारे दिला जातो. औद्योगिक महागाई भत्ता (Industrial Dearness Allowance) आणि परिवर्तनशील महागाई भत्ता (Variable dearness allowance). औद्योगिक महागाई भत्ता दर ३ महिन्यांनी बदलतो. हे केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रात (PSU) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) च्या महागाई दराच्या आधारावर त्याचे कॅल्क्युलेशन केलं जातं. तसेच, परिवर्तनीय महागाई भत्त्याची पुनरावृत्ती दर 6 महिन्यांनी केली जाते. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) च्या महागाई दराच्या आधारे देखील त्याचे कॅल्क्युलेशन केलं जातं.

DA किती वाढू शकतो ?

जानेवारी 2023 मध्ये DA 4% ने वाढण्याची अपेक्षा आहे. या वाढीमुळे DA 42 टक्क्यांवर पोहोचेल. मात्र, तो कधी लागू होणार ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, मार्च 2023 मध्ये होळीच्या आसपास देण्याची घोषणा केली जाऊ शकते. महागाई भत्ता वाढल्याने सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *