Take a fresh look at your lifestyle.

मातृवंदन योजना : 1 कोटी 87 लाखांचा निधी, ‘या’ जिल्ह्यातील 4,558 गर्भवती मातांच्या खात्यावर 5,000 रुपये जमा, तुम्हीही असा घ्या लाभ..

0

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत जिल्ह्यातील 4 हजार 558 लाभार्थ्यांच्या खात्यावर 1 कोटी 98 लाख 22 हजार रुपये वर्ग झाले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली आहे.

डॉ. माने म्हणाले की, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेंतर्गत गरोदरपणापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत तीन टप्प्यांत पाच हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 150 दिवसांच्या आत शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे.

मात्र या योजनेअंतर्गत मातांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात तांत्रिक अडचण आली होती,ही अडचण दूर झाल्याने आरोग्य प्रशासनाने 1 कोटी 98 लाख 22 हजार रुपयांचे रक्कम 4,558 लाभार्थी मातांच्या बँक खात्यावर जमा केली आहे.

ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहतात तसेच त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

त्यामुळे माता आणि मालकांचे आयुष्य सुधारण्यासाठी गर्भवतीला तसेच त्यांना मातेला सकस आहार घेण्यासाठी प्रोसाहित करण्यासाठी मात्र वंदन योजना राज्यात दिनांक 8 डिसेंबर 2017 पासून सुरू केली आहे.

या योजनेत केंद्र शासनाचा 60% तर राज्य शासनाचा 40% वाटा असतो. सांगली जिल्ह्यात एप्रिल 2017 पासून आज पर्यंत 1,4,123 मातांना लाभ देण्यात आला आहे.

या मातांच्या खात्यावर 43 कोटी 23 लाख 74 हजार रुपयांचे रक्कम वर्ग करण्यात आली असून सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर माने यांनी केले आहे.

लाभ कसा घ्याल ?

संपूर्ण भारतभर या योजनेचा जिल्हापातळीवर लाभ दिला जातो. परंतु माहितीच्या अभावामुळे अनेक गर्भवती माता भगिनी या योजनेपासून वंचित राहतात. ज्या गर्भवती माता भगिनींना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी खाली दिलेला PDF फॉर्म डाऊनलोड करून झेरॉक्स मारावे. त्यानंतर फॉर्म भरून आपलं आधारकार्डचे झेरॉक्स जोडावे.

PDF फॉर्म डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा

यानंतर हा फॉर्म आपल्या जवळच्या ग्रामीण रुग्णालय किंवा अंगणवाडी केंद्रात जमा करावा..

Leave A Reply

Your email address will not be published.