देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि अनेक राज्यांना जोडणाऱ्या सुरत – चेन्नई या राष्ट्रीय महामार्गाच्या भू – संपादनाला सोलापूर जिल्ह्यात गती मिळाली. आतापर्यंत जिल्ह्यातील 3 हजार 311 शेतकऱ्यांना 187 कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जवळपास 600 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे.

बार्शी तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी 148 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी 56 कोटी 38 लाख रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी 194 कोटी रुपये मंजूर होते. त्यापैकी आतापर्यंत 67.35 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे.

अक्कलकोट तालुक्यासाठी 182 कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी 56 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यासाठी 10 कोटी मंजूर होते. त्यापैकी 6.84 कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले असल्याची माहिती भू – संपादन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे .

शेतकऱ्यांची वाढीव मोबदल्याची मागणी कायम असली तरी अतिरिक्त वाढीव मोबदला मिळावा, या अटीवर जिल्ह्यातील जवळपास 3 हजार 311 शेतकऱ्यांनी आतापर्यंत 187 कोटी रुपयाची नुकसान भरपाई स्विकारली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि संपादन विभागाला आतापर्यंत 246 हेक्टर जमिनी संपादित करण्यात यश आले आहे.

उर्वरित शेतकऱ्यांनी मोबदला मिळावा; यासाठी प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. त्यासाठी तीन तालुक्यातील विविध गावात शिवरही घेण्यात आली आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात असल्याची माहिती भूसंपादन विभागाने दिली आहे.

जिल्हानिहाय शेतकऱ्यांची नावे – अन् रोडमॅप 

इथे क्लिक करा

आतापर्यंत 3 हजार 311 शेतकऱ्यांनी स्विकारले 187 कोटी..

सोलापूर जिल्ह्यात सुरत – चेन्नई या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत जमिनीच्या मोबदल्यासाठी 584 मागणी प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झाले. त्यापैकी 3 हजार 311 शेतकऱ्यांनी जवळपास 187 कोटी रुपयांचा मोबदला स्विकारला आहे. या माध्यमातून 246 हेक्टर जमीन संपादित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यापैकी जवळपास 12 ऑवार्ड मंजूर करुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठविण्यात आले आहेत. मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यापासून हे ऑवार्ड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडेच प्रलंबित असल्याने त्या शेतकऱ्यांच्या मोबदला वाटपाला अडचणी निर्माण झाल्या आहेत.

तीन तालुक्यातील 9 गावात शिबीर..

सुरत – चेन्नई या राष्ट्रीय महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांनी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीचा मोबदला स्विकारावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अक्कलकोटसह तालुक्यातील मैदर्गी, चपळगाव बार्शी तालुक्यातील वैराग, पानगाव, अलिपूर तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी, तांदुळवाडी असे एकूण 9 गावात शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *