भूमिअभिलेख विभागाच्या वतीने तलाठी (गट – क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या दरम्यान होणार आहेत. परीक्षेची पूर्वतयारी झाली असून उमेदवारांना केंद्राचे नाव किमान 10 दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे. तर परीक्षेचे पत्र आणि केंद्र तीन दिवस अगोदर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (Talathi Bharti 2023)
ही परीक्षा तीन सत्रात होणार असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ऑनलाइन परीक्षा घेताना परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परिसरात जॅमर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. राज्यभरातून तलाठी पदाच्या 4 हजार 466 या पदांसाठी 11 लाख 10 हजार 53 उमेदवार बसणार आहेत.
या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असून ही परीक्षा तीन सत्रात होणार आहे. त्यामध्ये सकाळी 9 ते 11 दुपारी 12.30 ते 2.30 आणि दुपारी 4.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंतची वेळ निश्चित केली आहे.
उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेचे ठिकाण अगोदरच समजणार असून, परीक्षा मात्र दिवस अगोदर हॉल तिकिटाबरोबरच दिसणार आहे परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे.
टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात आली आहे. मागील काळात शिक्षक, तलाठी तसेच या विभागाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान ऑनलाइन घडलेल अनुचित प्रकार आणि इतर घटनांची पार्श्वभूमी पाहता परीक्षा केंद्रांवर जाताना परीक्षार्थींना कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण, मोबाईल किंवा घड्याळ देखील नेण्यास मज्जाव केला आहे.
तलाठी भरती 2023 अधिसूचना
उमेदवार समोर बसल्यानंतरच पंधरा मिनिटांनंतर प्रश्नावली समोर येईल प्रत्येक प्रश्नावली वेगवेगळी असून त्या नियोजनानुसार वेगवेगळे स्वतंत्र सेट तयार केले आहेत. तसेच परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परिसरात जॅमर बसवण्यात येणार असल्याची माहिती भूमिअभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक तथा अपर जमाबंदी आयुक्त तसेच राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली.