शेतीशिवार टीम, 3 फेब्रुवारी 2022 : TATA मोटर्सने या वर्षी जानेवारी महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक वाहने विकण्याचा रेकॉर्ड नोंदवला आहे. जानेवारी महिन्यात भारतात विकल्या गेलेल्या टॉप 10 कारच्या यादीत TATA च्या 2 सर्वात यशस्वी कार देखील आल्या आहेत.Tata Nexon ही सलग दुसऱ्या महिन्यात भारतात सर्वाधिक विक्री होणारी SUV म्हणून उदयास आली आहे.

Tata Motors ने गेल्या महिन्यात Nexon SUV च्या 13816 युनिट्सची विक्री केली, जी एका महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. नेक्सॉनमध्ये गेल्या वर्षीच्या जानेवारीत विक्री झालेल्या 8225 युनिट्सच्या तुलनेत सुमारे 68% वाढ झाली आहे.

Tata ने डिसेंबरमध्ये Nexon च्या 12899 युनिट्सची विक्री केली. भारतातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी म्हणून Hyundai ला मागे टाकण्यात टाटा मोटर्ससाठी हे एक यशस्वी मॉडेल ठरलं आहे. टाटा नेक्सॉनची किंमत रु. 7.39 लाख (Ex-showroom)) पासून सुरू होते.

फीचर्स :-

फीचर्स च्या बाबतीत, Tata Nexon ला प्रोजेक्टर हेडलॅम्प, LED DRLs, आयव्हरी कलर बॉडी, LED टेल लाइट्स, इंटिग्रेटेड स्पॉयलर, रूफ रेल्स आणि ड्यूल टोन पेंटजॉब मिळतात.

याशिवाय थ्री टोन डॅशबोर्ड, टंबूर डोर मेकॅनिझमसह सुसज्ज सेंट्रल कन्सोल आणि हरमन सोर्स 6.5 इंच कार डिस्प्ले टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे.

ही सिस्टीम 8 स्पीकरने सुसज्ज असून ती Android Auto ला सपोर्ट करते. यात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हॉइस कमांड, सेन्सर्ससह रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि मागच्या सीट्सवर प्रवाशांसाठी एअर व्हेंट्स दिले आहेत.

इंजिन :-

Tata Nexon 2 इंजिन ऑप्शन्ससह .1.2-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन आणि 1.5-लिटर डिझेल इंजिनचा आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये 1.2-लीटर DOHC 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड रेव्होट्रॉन मोटर देण्यात आली आहे.

हे 110 पीएस पॉवर आणि 170 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. डिझेल व्हेरियंट मध्ये 1.5-लिटर 4-सिलेंडर टर्बोचार्ज्ड रेव्होटोर्क इंजिन आहे जे 109 PS पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट करतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *