शेतीशिवार टीम, 2 फेब्रुवारी 2022 : : टाटा मोटर्सने या महिन्याच्या सुरुवातीला CNG गाडी लाँच केल्यानंतर त्याही Maruti Suzuki आणि Hyundai सारख्या कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे.त्याची CNG वाहने आधीच बाजारात उपलब्ध आहेत.

टाटा मोटर्सने CNG पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये मोठी हिस्सेदारी करण्याच्या उद्देशाने टिगोर (Tigor) आणि टियागो सीएनजी व्हर्जन (Tiago CNG version) लाँच केले आहे .आता यानंतर कंपनीने नवीन माहिती शेअर केली आणि सांगितले की, लॉन्च झाल्यानंतर काही आठवड्यात या दोन वाहनांच्या 3,000 युनिट्सची विक्रीही झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांची CNG गाड्यांची मागणी वाढली आहे. याच कारणामुळे मोठमोठ्या ऑटो कंपन्या आता पेट्रोलसोबतच CNG व्हेरिएंट मार्केटमध्ये येत आहेत.

Tiago CNG आणि Tigor CNG सह, Tata Motors ही Hyundai नंतर दुसरी ऑटोमेकर बनली आहे. ज्यांनी आपल्या गाडयांना पेट्रोल, डिझेल, CNG आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह कार उपस्थित केलं आहे . टाटा ने सीएनजी व्हेरियंटसह (CNG variant) हे लॉन्च केले आहेत. जे या वाहनांना चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी मदत करू शकते.

किंमत, मायलेज :-

Tata Tiago CNG ची किंमत रु. 6.09 लाख (Ex-showroom) पासून सुरू होते, तर Tata Tigor CNG ची किंमत ₹ 7.69 लाख (Ex-showroom) पासून सुरू होते. टाटा मोटर्सने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींसोबतच चांगली रेंज आणि वातावरण लक्षात घेऊन कारची सीएनजी रेंज लॉन्च केली आहे. Tiago आणि Tigor CNG च्या मायलेजचा तपशील टाटाने अजून उघड केलेला नाही. पण नुकतीच लाँच झालेली मारुती सेलेरियो सीएनजी ही 35.60Km मायलेज देतं आहे.

Tata Tiago CNG :-

टाटा टियागो सीएनजी (Tata Tiago CNG) कॉस्मेटिकली स्टँडर्ड मॉडेलसारखीच आहे. हॅचबॅकमध्ये फॅक्टरी-फिट केलेले CNG किट हा एकमेव बदल आहे जो 1.2-लीटर रेव्होट्रॉन इंजिनसह येतो. इंजिन 73 PS चा Power Output देतं . हे 165 Mm ground clearance सह येते.

फीचर्स :-

कारला प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, ग्रिलवर क्रोम ट्रिम्स मिळतात. केबिनमध्ये हरमन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. Tata Tiago CNG 5 वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये आणि चार वेरिएंटमध्ये XE, XM, XT आणि XZ+ मध्ये येणार आहे. हॅचबॅकचे कलर – मिडनाईट प्लम, ऍरिझोना ब्लू,ओपल व्हाइट, फ्लेम रेड आणि डेटोना ग्रे आहेत.

Tata Tigor CNG :-

CNG व्हेरियंट लॉन्च करून पेट्रोल, ऑल-इलेक्ट्रिक आणि CNG व्हेरियंट असलेली Tata Tigor ही भारतातील पहिली कार बनली आहे. Tiago CNG प्रमाणे, Tigor CNG ला फॅक्टरी फिट केलेले CNG किट देखील मिळते जे 1.2-लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिनला मिळते.

फीचर्स :-

यात ऑटोमॅटिक हेडलँप, ड्युअल-टोन रूफ, रेन सेन्सिंग वायपर इ. केबिनच्या आत, याला ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल, सात इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. Tata Tigor CNG 4 वेगवेगळ्या रंगांच्या ऑप्शनमध्ये आणि 2 व्हेरियंटमध्ये येते, जे XZ आणि XZ+ आहेत. या कारच्या कलर ऑप्शनमध्ये मैग्नेटिक रेड, एरिजोना ब्लू, ओपल व्हाइट, डेटोना ग्रे आणि डीप रेड हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *