शेतीशिवार टीम, 2 फेब्रुवारी 2022 : जर तुम्ही असे स्टॉक शोधत असाल जे तुम्हाला चांगली कमाई देऊ शकतील तर तुम्ही जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर (Genus Power Infrastructure) स्टॉक्सकडे पाहू शकता.
जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरचे (Genus Power Infrastructure) शेअर्स बुधवारी (BSE) बीएसईवर 11 टक्क्यांनी वाढून 79 रुपयांच्या पुढे गेले. आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर या मल्टीबॅगर स्टॉकवर ICICI सिक्युरिटीज तेजीत आहे.
Budjet नंतर कंपनीच्या शेयर्समध्ये तेजी…
ब्रोकरेज फर्मला स्टॉक आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, कारण पुढील ऑर्डर्समध्ये जोरदार वाढ होणार आहे. आर्थिक वर्ष 22 च्या तिसर्या तिमाहीत प्रचंड ऑर्डरमुळे, कंपनीकडे 11.6 अब्ज रुपयांच्या ऑर्डर होत्या, तर कंपनीकडे आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत 8.8 अब्ज रुपयांच्या ऑर्डर होत्या.
ब्रोकरेजने Genus Power Infra च्या शेअर्ससाठी 117 ची टार्गेट प्राईस सेट केली आहे आणि त्याला BUY रेटिंग दिले आहे. गेल्या एका वर्षाच्या कालावधीत स्टॉक 114 % अधिक वाढला आहे, तर 2022 पर्यंत स्टॉक 12.43% वाढला आहे.
ब्रोकरेज हाऊसचं नेमकं काय आहे म्हणणं…
ICICI सिक्युरिटीजने या स्टॉकवर जारी केलेल्या नोटमध्ये म्हटलं आहे की, “कंपनीच्या व्यवस्थापनाला विश्वास आहे की, कंपनीच्या पुनर्रचनाची प्रक्रिया आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत पूर्ण केली जाईल.
FY 2023 नंतरचा कंपनीचा दृष्टीकोन अधिक मजबूत असल्याचे दिसते. सेमी-कंडक्टरच्या उपलब्धतेत सुधारणा, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली घसरण आणि रु. 3 लाख कोटी रुपयांची स्मार्टमीटर ट्रेडर पाइपलाइन यामुळे कंपनीला व्यवसायात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.