शेतीशिवार टीम, 2 फेब्रुवारी 2022 : मार्केटमधील दिग्गज इन्व्हेस्टर राकेश झुनझुनवाला यांनी काही तासांत टायटनच्या (Titan) शेअर्समधून सुमारे 342 कोटी रुपये कमावले आहेत. 2022 च्या अर्थसंकल्पात कट आणि पॉलिश्ड कट अँड डायमंडवरील कस्टम ड्युटी कमी करण्याच्या घोषणेनंतर टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी एकाच तासात मोठी उसळी पाहायला मिळाली. टायटन हा जेम्स अँड ज्वेलरी व्यवसायात आहे. अर्थसंकल्प 2022 च्या प्रस्तावामुळे कंपनीचा व्यवसाय मजबूत होईल, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

टायटनचे शेअर्स वाढले 75 रुपयांच्या पुढे…

1 फेब्रुवारी रोजी, दुपारी 1.15 च्या सुमारास, टायटन कंपनीच्या शेयर्सनी इंट्रा-डे नीचांकी (Intra-day low) रु. 2,358.95 ( दिवसाच्या व्यवहारातील नीचांकी पातळी) गाठली. यानंतर अर्थसंकल्पोत्तर रॅलीमध्ये टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये चांगलीच उसळी पाहायला मिळाली.

कंपनीचे शेअर्स 2,436.05 रुपयांवर बंद झाले. कंपनीचे शेअर्स 75.75 रुपयांनी वाढल्याने टायटनच्या शेअर्सच्या वाढीमुळे राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत अंदाजे 342 कोटींची वाढ झाली आहे.

टायटनचे (Titan) शेअर्स 2820 रुपयांपर्यंत वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज…

टायटन कंपनीच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2021 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 3,57,10,395 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण जारी केलेल्या पेड-अप भांडवलाच्या 4.02% आहे. त्याच वेळी, त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये 95,40,575 शेअर्स आहेत आणि कंपनीमध्ये 1.07 टक्के हिस्सा आहे.

राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीच्या कंपनीत एकूण हिस्सा 5.09% आहे. अल्पावधीत टायटन कंपनीचे शेअर्स 2,500 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स दीर्घ मुदतीसाठी 2,820 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *