शेतीशिवार टीम, 31 जानेवारी 2022 : भारतात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या मध्ये Tata Motors मोटर्स आघाडीवर आहे. Tata Motors च्या इलेक्ट्रिक SUV Nexon EV ने विक्रीत एक नवीन टप्पा गाठला आहे. कंपनीने सांगितले की, लॉन्च झाल्यापासून 2 वर्षांत या इलेक्ट्रिक वाहनाने 13,500 युनिट्सपेक्षा जास्त विक्रीचा आकडा पार केला आहे.

एप्रिल 2021 मध्येच कंपनीने सांगितले होते की, कारचे चार हजार युनिट्स विकले गेले आहेत. अशा प्रकारे, एकूण 10 महिन्यांत, Nexon EV ने 9000 हून अधिक युनिट्स विकल्या आहेत.

सध्या, Tata Nexon EV ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. त्याची दर महिन्याला सुमारे एक हजार युनिट्सची विक्री होते. टाटा मोटर्सची ही पहिली इलेक्ट्रिक कार होती, जी प्रायव्हेट बायर्ससाठी आणली गेली होती. किमतीबद्दल बोलायचं झालं तर Tata Nexon EV ची किंमत रु.14.29 लाख ते रु.16.90 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

310KM पेक्षा जास्त रेंज…

Tata Nexon EV मध्ये, कंपनीने 30.2 kWh क्षमतेचा लिथियम-आयन लिक्विड कूल्ड बॅटरी पॅक दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जमध्ये 315 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही फास्ट चार्जिंग सिस्टमसह केवळ 1 तासात 80% पर्यंत चार्ज होते. तर नियमित चार्जरसह, या कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 8 ते 9 तास लागतात.

या इलेक्ट्रिक कारला 127 bhp आणि 245 Nm पीक टॉर्कसाठी ट्यून केली गेली आहे. याचा सर्वाधिक वेग 120 किमी प्रतितास आहे. ही कार 9.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. त्याचा बॅटरी पॅक IP67 रेटेड वॉटर रेझिस्टंट आहे.

कंपनी आपल्या बॅटरीवर 8 वर्षे / 1.6 लाख किमी वॉरंटी देखील देते. Nexon EV तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो – सिग्नेचर टील ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि मूनलाईट सिल्व्हर. अलीकडेच, कंपनीने एक डार्क एडिशन देखील सादर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *