Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan : 1 जानेवारीला 2 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नाही हप्ता ; ‘हे’ आहे मोठं कारण, तुमचं तर यात नाव नाही ना ?

0

शेतीशिवार टीम, 30 डिसेंबर 2021: पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Sanman Nidhi) 10व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या करोडो शेतकऱ्यांसाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. चांगली बातमी अशी आहे की, 10वा हप्ता ई-केवायसी (E-KYC) शिवाय शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे.

वाईट बातमी अशी आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जानेवारीला पीएम किसानशी (Pm Kisan) संबंधित करोडो शेतकऱ्यांना नवीन वर्षाचं गिफ्ट देणार आहेत, परंतु त्यापैकी 2 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 1 जानेवारीला हे गिफ्ट मिळणार नाही…

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, PM मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) अंतर्गत 10 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांचा 10 वा हप्ता जारी करणार आहेत.

पीएम किसान पोर्टलवर (PM Kisan Portal) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 12.30 कोटींहून अधिक शेतकरी रजिस्टर्ड आहेत आणि 1 जानेवारी 2000-2000 रुपये 10 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात डिसेंबर-मार्चचा हप्ता 10 व्या हप्त्याच्या स्वरूपात येणार आहे. अशा परिस्थितीत 2 कोटींहून अधिक पीएम किसानच्या लाभार्थ्यांना या गिफ्ट पासून वंचित राहावं लागू शकतं.

विशेष म्हणजे, पंतप्रधान कार्यालयाने बुधवारी एका निवेदनात म्हटलं आहे की, पंतप्रधान 1 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 10 वा हप्ता जारी करतील. यासह, सुमारे 351 शेतकरी उत्पादक संस्थांना (FPOs) 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त इक्विटी अनुदान देखील जारी केले जातील. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर हेही उपस्थित राहणार आहेत. पीएम-किसान योजनेंतर्गत, दर चौथ्या महिन्याला 2000 रुपयांच्या तीन मासिक हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात.

ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ता लटकलेले टॉप 10 राज्ये :-

राज्य कुल रजस्टर्ड किसान पेमेंट सक्सेस पेमेंट फेल पेमेंट रिस्पांस पेंडिंग
पश्चिम बंगाल 4,144,192 2,720,201 3,388 2,156,717
झारखंड 3,086,638 1,437,556 4,387 349,278
असम 3,131,333 1,344,216 2,385 250,454
ओडिशा 4,054,640 3,963,982 28,356 240,730
महाराष्ट्र 11,468,960 11,313,936 96,106 227,045
तेलंगाना 3,934,691 3,534,724 25,420 168,179
मध्य प्रदेश 9,016,140 8,291,644 54,996 145,901
गुजरात 6,491,371 5,474,849 53,943 127,102
राजस्थान 7,888,684 7,168,384 56,278 119,542
उत्तर प्रदेश 28,175,093 22,938,077 126,380 74,423
टोटल 123,078,826 104,167,564 749,299 4,064,196

 

शेवटच्या हप्त्याबद्दल बोलायचं झालं तर 12.30 कोटींहून अधिक शेतकर्‍यांपैकी 2000-2000 चा हप्ता फक्त 10 कोटी 41 लाख 67 हजार 564 लाभार्थ्यांच्या खात्यावर पोहोचला. 74 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची देयके अयशस्वी झाली आणि 40 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे हप्ते थांबवण्यात आले.

हा हप्ता (E-KYC) विना मिळणार :-

पीएम किसान योजनेंतर्गत, ई-केवायसीशिवाय (E-KYC) 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाईल. आता कोणत्याही शेतकऱ्याने ई-केवायसीसाठी (E-KYC) काळजी करू नये, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. डिसेंबर-मार्चच्या हप्त्यानंतर, e-KYC आगाऊ हप्ता अनिवार्य असेल, ज्यासाठी पोर्टलवर e-KYC सुरू झाल्यावर प्रत्येकाला सूचित करण्यात येणार आहे.

हप्त्याला का झाला उशिर :-

जर तुम्हाला ऑगस्ट-नोव्हेंबरसाठी 2000 रुपयांचा हप्ता मिळाला नसेल, तर तुमच्या कागदपत्रांमध्ये काही कमतरता असू शकते. उदाहरणार्थ, तुमच्या आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांकामध्ये चूक होऊ शकते. असे झाले तर येणारे हप्तेही मिळू शकणार नाहीत. पुढील हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमच्या खात्यात जमा व्हावा असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमची स्थिती तपासा आणि चूक सुधारा. जाणून घ्या घरबसल्या अशी चूक तुम्ही दुरुस्त करू शकता. यासाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) जाण्याचीही गरज नाही. या सोप्या टेप्स करा फॉलो…

पीएम-किसान योजनेच्या (https://pmkisan.gov.in/) या अधिकृत वेबसाइटला भेट द्या…
वेबसाइटवरील फार्मर कॉर्नरवर (Farmer’s Corner) क्लिक करा.
या नंतर इज नवं पेज उघडेल तिथे (Edit Aadhaar Details) या ऑप्शन वर क्लिक करा.

येथे तुमचा आधार क्रमांक (Aadhaar number) टाका. त्यानंतर कॅप्चा कोड (CAPTCHA code) टाकून सबमिट करा.
जर यात काही त्रुटी आधल्या तर त्या ऑनलाइन दुरुस्त करू शकता.
जर इतर काही त्रुटी आधल्या तर तुम्ही तुमच्या लेखापाल व कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

याशिवाय, वेबसाइटवर दिलेल्या हेल्पडेस्क पर्यायावर (Helpdesk options) क्लिक केल्यानंतर, आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर ज्या काही चुका असतील त्या तुम्ही दुरुस्त करू शकता. तुमचे पैसे का अडकले आहेत ? याचीही माहिती तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुम्ही चुका सुधारू शकता…

Leave A Reply

Your email address will not be published.