शेतीशिवार टीम, 30 डिसेंबर 2021 : सर्व ड्राय फ्रुटस आरोग्यासाठी चांगलेच मानले जातात. त्याचप्रमाणे अक्रोड खाण्याचेही अनेक फायदे आहेत. पण हिवाळ्यात अक्रोड कोरडे न खाता भिजवून खाल्ल्यास ते आरोग्यासाठी दुप्पट फायदेशीर ठरते. विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळी अनुशापोटी भिजवलेलेअक्रोड खाणे खूपच फायदेशीर ठरते. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. चला जाणून घेऊया अनुशापोटी 2 भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने कोणते आजार दूर होतात.
भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने या आजारांपासून होतो बचाव :-
दात आणि हाडे मजबूत होतात :-
अक्रोडमध्ये दात आणि हाडे मजबूत करणारे घटक असतात.याशिवाय स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यास मदत होते.
पोटासाठी फायदेशीर :
अक्रोडमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने, योग्य पचन राखण्यासाठी खूप उपयुक्त आहे. रोज सकाळी अनुशापोटी अक्रोडाचे सेवन केल्याने पोटाचं कार्य सुरळीत चालतं.
हृदय निरोगी ठेवते :-
भिजवलेल्या अक्रोडात ओमेगा-३ फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. हे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं.