काहीतरी ठेवा रे ! आता केंद्र सरकारने आणखी एक ‘ही’ मोठी कंपनी काढली विकायला ; 2,000 कोटी कमवण्याचं आहे टार्गेट…

0

शेतीशिवार टीम : 1 सप्टेंबर 2022 : केंद्र सरकारच्या आणखी एका कंपनीचे खाजगीकरण Privatization होऊ होणार आहे. भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड (BEML) असे या कंपनीचे नाव आहे. ही धोरणात्मक विक्रीद्वारे (Strategic sell) विकली जाणार असल्याचा रिपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये सांगितलं आहे की, डिसेंबर तिमाहीत सरकार BEML च्या खाजगीकरणासाठी आर्थिक बोली लावणार असल्याची एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने या महिन्याच्या सुरुवातीला BEML ची जमीन (Land) आणि नॉन-कोअर मालमत्ता BEML Land Assets Ltd मध्ये विलय करण्यास मान्यता दिली होती.

BEML Land Assets मध्ये मिळणार हिस्सा :-

BEMLच्या प्रत्येक भागधारकाला बीईएमएल Land Assets लिमिटेडमध्ये हिस्सा मिळणार असून डिमर्जरची प्रक्रिया सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला पूर्ण केली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. ” BEMLच्या धोरणात्मक विक्रीसाठी आर्थिक निविदा सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस विभक्त प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमंत्रित केल्या जातील असे ते म्हणाले…

सरकार विकणार आहे 26% हिस्सा :-

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आर्थिक बोली ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत येणे अपेक्षित आहे. तोपर्यंत शेअर खरेदी कराराचा मसुदाही अंतिम केला जाईल. सरकारने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये व्यवस्थापन नियंत्रणासह BEML मधील 26% भागभांडवल विकण्यासाठी प्राथमिक निविदा मागवल्या होत्या.

सरकारकडे सध्या आहे 54.03 % हिस्सा :- 

संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम BEML मध्ये सरकारचा 54.03% हिस्सा आहे. BEML मधील सरकारचा 26% हिस्सा सध्याच्या बाजारभावानुसार विकल्यास सुमारे सरकारला या खाजकीकरणातून 2,000 कोटी रुपये मिळणार असल्याचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.