शेती शिवार टीम,16 मे 2022 :- वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे एफएमसीजी (FMCG) कंपन्या याला तोंड देण्यासाठी नवीन पध्दतीचा अवलंब करत आहेत. उत्पादने महाग करण्याऐवजी ते वजन कमी करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना किंमत आधीचीच पण वस्तूंच्या वजनात घट केलेले पॉकेट मिळत आहे .
याशिवाय FMCG कंपन्या काही उत्पादनांचे स्वस्त पॅक बाजारात आणणार आहे, याशिवाय त्यांनी जाहिरातींचा खर्चही कमी करत आहेत. रशिया-युक्रेनमुळे सर्वच वस्तू प्रदीर्घ काळापासून महागल्या आहेत. यासोबतच इंडोनेशियातून पामतेल निर्यातीवर बंदी घातल्याने कंपन्यांची चिंता वाढली आहे. याचा सर्वाधिक परिणाम कंपन्यांच्या कमाईवर होताना दिसून येत आहे.
दररोज वापरल्या जाणार्या उत्पादनांवर होणार परिणाम…
महागाईचा सर्वाधिक फटका बिस्किटे, चिप्स, आलू भुजिया, छोटे साबण, चॉकलेट्स आणि नूडल्स या उत्पादनांना बसत आहे. ही उत्पादने दररोज घरांमध्ये वापरली जातात. पार्ले प्रॉडक्ट्सचे कॅटेगरी हेड मयंक शाह यांचं म्हणणं आहे की, कमी वजनाच्या पॅकना जास्त मागणी आहे.
आलू भुजिया आता 13 ग्रॅम कापलं…
हल्दीरामने आलू भुजियाच्या पॅकचे वजन 13 ग्रॅम घटवून ते 42 ग्रॅम केले आहे. पूर्वी ते 55 ग्रॅम होतं. पार्ले जीने (Parle G) 5 रुपयांच्या बिस्किटांचे वजन 64 ग्रॅमवरून 55 ग्रॅम, तर विम बारचे वजन 20 ग्रॅमने कमी केलं आहे. ते आता 155 ऐवजी 135 ग्रॅम झालं आहे.
बिकाजीने Bikaji Namkeen पॅकेटचे वजन केलं निम्यानी कमी…
बिकाजीने नमकीनचे (Bikaji Namkeen) 10 रुपये किमतीचे पाकीट अर्ध्यांनी कमी ठेवलं आहे. पूर्वी ते 80 ग्रॅमचे होते ते आता 40 ग्रॅम झालं आहे. बहुतेक कंपन्यांनी हँडवॉशचे वजन 200 मिली वरून 175 मिली पर्यंत कमी केलं आहे.
छोट्या पॅकचं 25 ते 33% योगदान :-
1 ते 10 रुपयांचे छोटे पॅक बहुतेक FMCG कंपन्यांच्या व्यवसायात 25-35% योगदान देतात. ते मोठ्या पॅकच्या किंमती वाढवतात, परंतु लहान पॅकच्या किमती वाढवणे हा तोट्याचा सौदा ठरतो, म्हणून महागाईच्या काळात त्यांनी किमती कमी ठेवल्या आहेत पण वजनात घट केली आहे.
शहरांमध्ये भाव वाढले अन् खेड्यांमध्ये वजन केलं कमी….
डाबर(Dabur) इंडियाने म्हटले आहे की, शहरी भागात ग्राहक जास्त पैसे देऊ शकतात, जिथे उत्पादने महाग झाली आहेत. 1 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयांचे पॅक येथे अधिक विकले जात असल्याने गावांमध्ये पॅकेटचे वजन कमी झाले आहे. महागाईने नजीकच्या काळात दिलासा न दिल्यामुळे, कंपन्या आता ब्रिज पॅक देखील सादर करत आहेत, ज्याचा अर्थ दोन किमतीची उत्पादने एकामध्ये एकत्र करणे…
HUL ने स्वीकारलं ब्रिज पॅकचे धोरण :-
हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ने सांगितले की, महागाईचा सामना करण्यासाठी ते ब्रिज पॅकचे धोरण अवलंबत आहे. इमामीच्या एकूण व्यवसायात लहान पॅकचा वाटा 24% आहे. ब्रिटानियाने सांगितले की 5 आणि 10 रुपयांची उत्पादने त्यांच्या व्यवसायात 50-55% योगदान देतात.