Take a fresh look at your lifestyle.

देशातली सर्वात लांब बुलेट ट्रेन महाराष्ट्रात ! मुंबई ते सोलापूरपर्यंत ‘या’ जिल्ह्यांत होणार भूसंपादन, खा. निंबाळकर यांची माहिती, पहा Route Map..

0

देशातील बहुचर्चित व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेन आहे. हा प्रकल्पामध्ये माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातून जावा, अशी विनंती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे मंत्री व पंतप्रधानांना भेटून व पत्राद्वारे केली होती. ती मान्य करून आता या बुलेट ट्रेनचा मार्ग माळशिरस, अकलूज, पंढरपूर मार्गे सोलापूरहून हैदराबादकडे जाणार आहे.

हा प्रकल्प एनएचआरसीएल (NHRCL) अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनला सादर करण्यात आला. त्याचा पीफआर रिपोर्ट व डिपीआर रिपोर्ट झाला आहे तसेच टेक्निकल सर्व्हे चालक विहित विमानातून झाला आहे तसेच रेल्वे मंडळाला डीपीआर सादर करण्यात आला आहे.

लवकरच याला कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये मंजुरीची मुहूर्तमेढ लागून याला तांत्रिक मंजुरी मान्यता मिळेल, असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

711 किलोमीटरच्या मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर तयार झाला असून, या बुलेट ट्रेनच्या कामाला रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. प्रस्तावित प्रकल्पामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, माळशिरस, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा , विक्रबाद या मार्गे ही ट्रेन हैदराबाद येथे पोहचणार आहे. तसेच यामध्ये अकरा रेल्वे स्थानकाचा समावेश त्यामध्ये होणार आहे.

यामुळे मुंबई ते हैदराबाद प्रवास फक्त तीन तासात पूर्ण होणार आहे. देशातील अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याकारणाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे लवकरच शिष्टमंडळ घेऊन भेटणार आहेत.

पंढरपूरचा विठ्ठल, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, तुळजापूरची आई तुळजाभवानी, म्हसवड चा सिद्धनाथ, शिंगणापूरचा महादेव तसेच अनेक मंदिरांना अभिषेक घालून या मंदिराचा प्रसाद घेऊन खा. नाईक निंबाळकर पंतप्रधानांना लवकरच भेटणार आहेत.

काय आहे हा मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर प्रोजेक्ट..

सध्या, मुंबई आणि हैदराबाद दरम्यानच्या रेल्वे प्रवासाला सुमारे 14 तास लागतात. बुलेट ट्रेनने 700 किलोमीटरहून अधिकचा मार्ग कापण्यासाठी फक्त साडेतीन तास लागणार आहे. बुलेट ट्रेनचा कमाल वेग ताशी 350 Km असून सरासरी वेग सुमारे 250 Km प्रतितास असणार आहे. ट्रेनमध्ये 750 प्रवासी बसू शकतील इतकी सीटिंग कपॅसिटी असणार आहे. नवी मुंबई ते हैदराबाद या बुलेट ट्रेनच्या मार्गात एकूण 10 स्टेशन्स असतील. मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टचा रूट काय असेल ? ती कोणत्या स्टेशन्स मधून जाईल? जाणून घ्या सर्व अपडेट्स..

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनची खास वैशिष्ट्ये

कुठून कुठे – मुंबई ते हैदराबाद
रूट अंतर : 711 किमी
कमाल वेग: 350Kmph
ऑपरेशनल स्पीड : 320 Kmph
सरासरी वेग : 250kmph
ट्रॅक गेज : मानक (1435 mm)
ट्रेन सीटिंग कपॅसिटी : 750
मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मार्ग
लांबी : 711 किमी
प्रकार : एलिव्हेटेड, अंडरग्राउंड आणि एट – ग्रेड

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन : कोणत्या स्टेशन्सवर थांबणार ?
मुंबई ( बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स )
नवी मुंबई
लोणावळा
पुणे
कुरकंब / दौंड
अकलूज
पंढरपूर
सोलापूर
कलबुर्गी (गुलबर्गा)
झहीराबाद
हैदराबाद

Mumbai Hyderabad Bullet Train रूट मॅप पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

विमानातून केलं गेलं सर्वेक्षण..

लिडर सर्वेक्षण करून मुंबई – पुणे – हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा DPR तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात हे सर्वेक्षण सुरू झालं. सर्वेक्षणासाठी एरियल लिडार आणि इमेजरी सेन्सरने सुसज्ज विमान वापरण्यात आलं आहे.

बुलेट ट्रेनचा मार्ग विमानतळ आणि मेट्रोला जोडला जाणार..

या प्रोजेक्टचे टर्मिनल स्टेशन नवी मुंबईत बांधले जाऊ शकते. येथे बांधल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाशीही ते जोडण्याची योजना आहे. यासोबतच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकपर्यंत कनेक्टिव्हिटी देण्यासाठी नवी मुंबई मेट्रोलाही जोडण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.